सिन्नरमधे गोळीबार व महिलावरील अत्याचार याचा बंदोबस्त करणे व न्याय मिळावा यासाठी सिन्नर संघर्ष समिती, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष सिन्नर यांच्या वतीने तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संविधान जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दि.२३/१२/२४ रोजी ११-३० वाजता ते १ वाजेपर्यंत धरणे आंदोलन केले….
पत्रकार:-भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
सिन्नर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे,त्यामुळे सर्वसामान्य समाजाची दिशाभुल होते आहे. तालुक्यातील जनता सुरक्षित नाही सर्व सामान्य जनतेत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे या सर्व गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी सिन्नर येथील सामाजिक कार्यकर्ते व स्वराज्य पक्षाच्या तालुका अध्यक्ष शरद शिंदे यांच्या सह अन्याय आत्यचारीत पिढीत महिला व कार्यकर्ते यांनी तहसील कार्यालय समोर लाक्षणिक धरणे आंदोलन केले आहे.

सिन्नर तालुक्यात कायदा सुव्यवस्था राखु न शकणारे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्री पदाचा व आमदारकीचा राजीनामा दयावा.-शरद शिंदे पाटील
सिन्नरमधे दिवसा ढवळ्या नगरसेवकाच्या मुलावर गोळीबार, महिलांची नवरा छळवणूक करतात,सावत्र मुलांकडून छळवणूक, विधवा महिलेची शेतातील पिके दिवसाढवळ्या गावचे गुंड चोरतात,उमेदवार यांच्या गाडया फोडल्या जातात ,सभांची अडवणुक केली जाते अशा दादागिरी करणाऱ्या कृषीमंत्री श्री.माणिकराव कोकाटे यांच्या कार्यकर्ते यांचा बंदोबस्त करावा, यासाठी सिन्नर संघर्ष समिती, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष सिन्नर यांच्या वतीने तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संविधान जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दि.२३/१२/२४ रोजी ११-३० वाजता ते १ वाजेपर्यंत धरणे आंदोलन केले….
सिन्नर संघर्ष समिती व महाराष्ट्र स्वराज्य पार्टी सिन्नर यांनी धरणे आंदोलन,निवेदन…. दि.२३/१२/२०२४
प्रती,
माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब
माननीय ग्रुहमंत्री साहेब
महाराष्ट्र
माननीय एकनाथ शिंदे साहेब
उपमुख्यमंत्री
माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
उपमुख्यमंत्री
माननीय कलेक्टर साहेब
नासिक
माननीय प्रांतसाहेब, मेडम
निफाड सिन्नर
माननीय तहसीलदार साहेब
सिन्नर
माननीय पोलीस निरीक्षक साहेब
सिन्नर
सिन्नरमधे गोळीबार व महिलावरील अत्याचार याचा बंदोबस्त करणे व न्याय मिळणे बाबत.
माननीय महोदय,
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा जवळ धरणे आंदोलन करत आम्ही सिन्नरकर व सिन्नर संघर्ष समिती,महाराष्ट्र स्वराज्य पार्टी सिन्नर आपणास विनंती करितो की,सिन्नर तालुक्यात महिलावर अत्याचार,सासुरवास, नवरयाची गावच्या गुंडांची छळवणूक वाढली आहेत,
कोणीही येतात सिन्नर शहर व तालुक्यात दादागिरी करु जातात. दिवसा ढवळ्या गोळीबार होतोय.निवडणुकीत उमेदवारांच्या गाडया फोडल्या जातात.लोकशाही असलेल्या भारतात सिन्नर तालुक्यात सभा अडवतात, प्रचार करु दिला जात नाहीत .
नगरसेवक नामदेव लोंढे यांच्या मुलावर भरवस्तीत दुकानात दिवसाढवळ्या अंधाधुंद गोळीबार होतोय.सफासफ वार केले जातात. कूणी नेता,पक्ष आवाज उठवत नाहीत.महिलांना पती,सासरचे,गावचे टगे दादागिरी करतात. शेतातील माल चोरून नेला जातोय.तरीही न्याय मिळत नाहीत.
१)सोनाबे येथील शेवंता केरु पवार या महिलेचा तिचा पती केरु पवार व सावत्र मुल छळ करतात,रात्री११ वाजेपर्यंत घराबाहेर ठेवतात, मारहाण करतात,स्रीधन हिसकावून घेतले,सांभाळ करत नाहीत,शेतात कमावलेला माल हिसकावून नेला जातोय. चार महिने तक्रार करुनही न्याय मिळत नाहीत.
२)खडांगळी येथील शोभा कोकाटे विधवा महिलेची दिवसाढवळ्या सोयाबीन गावचे टगे चोरून नेतात.तक्रार करुनही न्याय मिळत नाहीत.
४)लोकशाही गरिबापर्यंत पोहचली पाहिजे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत आणि हा संविधानाचा हेतू.रयतेच स्वराज्य असावे असे छत्रपती शिवाजी महाराज म्हणत.तरीही सिन्नर तालुक्यात गरिबांना निवडणूक लढवू दिली जात नाहीत.प्रचार अडवला जातोय, बेनर फाडले जातात, सभा होऊ दिल्या जात नाहीत, उमेदवारांच्या गाडयांवर दगडफेक करून गाडया फोडल्या जातात. सिन्नर तालुक्यात भयंकर परिस्थिती आहेत.महिलांना छळवल जातय.दिवसाढवळ्या शेतातील माल चोरुन नेला जातोय. भरवस्तीत दिवसाढवळ्या पर तालुक्यातील गुंड येतात दादागिरी करतात, अंधाधुंद गोळीबार करतात. सरकार मजा बघतय.लोकप्रतिनिधी मंत्री माणिकराव कोकाटे गप्प. खासदार वाजे गप्प. मंत्री कोकाटे एक शब्द बोलत नाहीत. कारण दादागिरी, गुंडागर्दी करणारे हे मंत्री माणिकराव कोकाटे यांचेच कार्यकर्ते आहेत. आज सिन्नरचा बिहार होतोय.सिन्नर तालुक्यातील महिला, तरुण,वयोवृद्ध सुरक्षित नाहीत.जीव मुठीत धरून जगताय.मंत्री माणिकराव कोकाटे यांची ,मुलगी सिमंतीनी कोकाटें व त्यांच्या कार्यकर्तेंची सिन्नर तालुक्यात अरेरावी, गुन्हेगारी,दादागिरी वाढत चाललीय.सिन्नर तालुक्यात सर्वत्र सर्वसामान्य जनतेत भितीचे ,दहशतीचे वातावरण पसरले आहेत.न्याय मिळावा,दहशतवाद थांबावा,दादागिरी, गुंडगिरी
हि थांबली पाहिजे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सोमवार दि.२३/१२/२०२४ रोजी सकाळी११-३०वा.लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करत निवेदन देत मागणी करत आहेत.
जबाबदारी स्विकारत मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा का मागु नयेत? जर राज्यात बीड येथील सरपंच खुन व परभणीतील सूर्यवंशी यांचा म्रुत्यु बद्दल शरदचंद्रजी पवार साहेब, उध्वजी ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागत आहेत.बीडमधे मंत्री धनंजय मुंढे यांचा दशहतीमुळे राजीनामा मागितला जातोय.त्याच न्यायाने मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्री पदाचा व आमदारकीचा राजीनामा द्यावा. अशी मागणी आम्ही सिन्नरकर करत आहोत. सिन्नरकरांची दशवादातुन व दादागिरीतुन ,माणिकराव कोकाटेंच्या जुल्मी राजवटीतुन सुटका करत न्याय दयावा हि विनंती.अन्यथा मंत्रालयासमोर महिलांसह आमरण उपोषण करण्यात येईल.
कळावे
शरद तुकाराम शिंदे पाटील
संघर्ष समिती व स्वराज्य पक्ष सिन्नर
शिवाजी गुंजाळ, सुरेश सानप,संदिप लोंढे,प्रमिला लोंढे, सुरेखा गवारे,शेवंता पवा,शोभा कोकाटे, चिंधु गुंजाळ, निलेश चव्हाण, प्रियंका वरंदळ,सुनिता वरंदळ,स्मिता चौधरी, मिराबाई जाधव सहभागी होते.
सिन्नर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे,त्यामुळे सर्वसामान्य समाजाची दिशाभुल होत आहे. तालुक्यातील जनता सुरक्षित नाही सर्व सामान्य जनतेत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे,या सर्व गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी सिन्नर येथील सामाजिक कार्यकर्ते व स्वराज्य पक्षाच्या तालुका अध्यक्ष शरद शिंदे यांच्या सह अन्याय आत्यचारीत पिढीत महिला व कार्यकर्ते यांनी तहसील कार्यालय समोर लाक्षणिक धरणे आंदोलन केले आहे.
aonenewsmaharashtra@gmail.com. प्रतिनिधी:-भाऊसाहेब हांडोरे,
सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......






