best news portal development company in india

राहूड घाटात बस, ट्रक व मेंढ्या यांचा तिहेरी भीषण अपघात…..

SHARE:

aonenewsmaharashtra@gmail.com

 प्रतिनिधी नाशिक 

     राहुड घाटात बस,ट्रक व मेंढ्या यांचा तिहेरी भीषण अपघात,अपघातात मेंढपाळ बांधवांची मुलगी बायको यांनी रस्त्याच्या कडेला जोरात उडी मारल्यामुळे ते वाचल्या,मेंढपाळ याचे मोठे नुकसान…..

     आज दि.१६/१२/२०२४ रोजी ४/५ वाजेच्य च्या दरम्यान राहुड घाटामध्ये सटाणा तालुक्यातील ढोल बारे येथील धनराज   मेंढपाळ बांधव आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्या मेंढ्या सहित राहुड या ठिकाणी दरवर्षी येऊन आपले पोट भरण्याची काम करत होते.परंतु आज अचानक रस्ता क्रॉस करत असताना ठाणे डेपोची बस जळगावच्या दिशेने जात होती, राहुड घाटात ड्राइव्हचा बस वरील ताबा सुटून अपघात झाला,या अपघातात मेंढपाळ यांच्या 8 मेंढ्या मृत्यू मुखी पडल्याअसून  5/6 मेंढ्या जखमी झाल्या आहे तर  दोन शेळ्या व  वासरे दगावले आहे  असे एकूण 14 जनावरे मेंढपाळ यांना गमवावी लागली. मेंढपाळ बांधवांची मुलगी, बायको यांनी रस्त्याच्या कडेला जोरात उडी मारल्यामुळे ते वाचल्या गेल्या. अचानक घडलेला अपघात हा मेंढपाळांच्या जीवावरती लादला आहे . अशा अनेक घटना घडत असतात,परंतु मेंढपाळ यांना कुठल्याही प्रकारे मदत मिळत नाही. आणि तसेच आपलेजीवन मेंढपाळ  जगत असतात.

 

        याप्रसंगी समाधान बागल साहेब ,प्रहार संघटनेचे जिल्हा सरचिटणीसतसेच सामाजिक कार्यकर्ते,यांना ही बातमी कळताच राहुड येथील अपघात ठिकाणी धाव घेतली व प्रहार चे कार्यकर्ते व ग्रामस्थ जमा करून लागेच काही मिनिटांमध्ये मदत केली.

       देवळा पोलीस स्टेशन येथील पोलिससांशी संपर्क करून पंचनामा नोंदवून घेतला, तसेच बस ड्रायव्हर योगेश साहेबराव महाजन वरती गुन्हा दाखल करण्यात आला.मेंढपाळ बांधवास न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा अनेक घटना घडत असतात. परंतु मेंढपाळ बांधवांना कुठल्याही प्रकारे शासनाकडून मदत होत नाही,यासाठी प्रशासनाने  योग्य ती  पावले उचलावी. आणि मेंढपाळ बांधव यांना न्याय मिळवून देण्याचे काम करावे. असा इशारा सामाजिक कार्यकर्ते समाधान बागल यांनी दिला.

                                                             aonenewsmaharashtra@gmail.com

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई