प्रतिनिधी सिन्नर:-भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर: सिन्नर तालुक्यातील कोळगाव माळ येथील ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्रित येऊन सामूहिक राजीनामे दिले असून या राजीनाम्याची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक व सिन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.

येथील ग्रामपंचायत सरपंच हे महिला राखीव मुक्ताबाई विठ्ठल चंद्रे यांची एकमताने निवड करण्यात आली होती परंतु सरपंच सौ. चंद्रे यांचा मुलगा किरण विठ्ठल चंद्रे हे सरपंच म्हणून असले सर्व कामे स्वतः पाहतात तर सरपंच सौ. मुक्ताबाई चंद्रे ह्या फक्त नाममात्र आहे का असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे .
सरपंच सौ.मुक्ताबाई विठ्ठल चंद्रे ग्रामपंचायत कोळगाव माळ(ता.सिन्नर)
श्री.किरण चंद्रे यांचा ग्रामपंचायत कामामध्ये सतत हस्तक्षेप करून मनमानी पद्धतीने कारभार करत असल्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्रित येऊन सामूहिक राजीनामे दिले आहे. श्री तुळशीराम फकिरा भालेराव ,श्री वाल्मिक बाळासाहेब जुधारे,आयशा निसार पठाण ,रब्बान निजाम पटेल ,रंजना केशव कदम या पाच सदस्यांनी एकत्रित राजीनामे सरपंच सौ.मुक्ताबाई चंद्रे यांच्याकडे दिले आहे.
कोळगाव माळ येथील ग्रा.प.तीमध्ये सरपंच बाईचा मुलगा मनमानी पद्धतीने कारभार करत असुन आम्हाला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेत आहेत, त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला ग्रा.प. तीच्या सदस्य पदाचा राजीनामा देण्यास भाग पडावे लागले आहेत- वाल्मिक बाळासाहेब जुंधारे
सदस्य
ग्रा.प.कोळगाव माळ.
सरपंच हे फक्त नाममात्र आहे.आम्हाला विचारले जात नाही.परस्पर निर्णय घेतले जातात त्यामुळे आम्ही फक्त नाममात्र च आहे त्यामुळे सदस्य म्हणून राहण्यात काही ही उपयोग नाही त्यामुळे आम्ही राजीनामा देत आहे- आयशा निसार पठाण.
ग्रा.प.सदस्य को.माळ
aonenewsmaharastra@gmail.com
प्रतिनिधी सिन्नर:-भाऊसाहेब हांडोरे
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......












