कोळपेवाडी रस्त्यावर शहा गावाजवळ 0/7 या अंतर्गत सातशे मीटर सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामांच्या नावाखाली गेल्या दोन महिन्यापासून रस्ता खोदून ठेवला,ठेकेदाराचे मनमानीचे काम सुरू, गावकऱ्यांचे प्रवासी वाहतूक यांना अडचण ठेकेदाराचे उडवा उडवीचे उत्तरे………
सिन्नर प्रतिनिधी — भाऊसाहेब हांडोरे
कोळपेवाडी या रस्त्यावर शहा गावानजीक 0 /7 या अंतर्गत सातशे मिटर सिमेंट कॉक्रीटीकरण च्या कामासाठी हा रहदारी असलेल्या रस्ता कामांच्या नावाखाली गेल्या दोन महिन्यांपासून खोदुन ठेवला आहे. परंतु ठेकेदाराच्या मनमानी पद्धतीने काम सुरू असून त्याचा फटका गावकऱ्यांसह प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना बसत आहे.रस्त्याचं काम सुरू करण्याअगोदर पर्यायी व्यवस्था करावी लागते. किंवा रस्त्याचं काम करतांना फक्त एकच बाजू चं काम चालू केले जाते व एक बाजू रहदारी साठी मोकळा ठेवावी लागते असा सार्वजनिक बांधकाम विभागाचा नियम सांगतो, परंतु अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने या ठेकेदाराला पाठबळ दिले जात आहे.त्यामुळे नियम धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने काम करणाऱ्या ठेकेदाराने विलंब न करता त्वरित काम सुरू करावी व प्रवाशांची गैरसोय टाळावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे …
याबाबत संबंधित ठेकेदार नंदु खताळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की.. रस्ता तयार करण्यात पुर्वी मोऱ्यांचे काम चालू होते त्यामुळे काम थांबले आहे, अजून काम सुरू करण्यासाठी जवळपास एक महिना लागु शकतो. आणि पुर्ण कधी होणार हे मात्र मला नक्की सांगता येणार नाही असे सांगुन ठेकेदाराने हात झटकले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात कामे सुरू करून विकासाची घोडदौड सुरू असल्याचे दाखवून आपला उद्देश साध्य करणारे संबंधित लोकप्रतिनिधींनी निवडणूक संपताच सुरू केलेल्या कामाकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे फक्त ठेकेदाराच्या भरवशावर हे काम सुरू आहे, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.
सध्या खोदुन ठेवलेल्या या रस्त्यावर दोन – तीन वाहनांचा अपघात झाला असून दुर्दैवाने जीवित हानी अजून झाली नाही ,पण ऐन रस्त्यावर हे वाहणे आडवे असल्याने इतर प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना मोठी अडचण निर्माण होत आहे. पलटी झालेल्या या वाहनांमध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर एक मालवाहू ट्रक यांचा समावेश आहे.तरी संबंधित आधिकारी यांनी जीवित हानी होण्याची वाट न बघता लक्ष घालून काम लवकरात लवकर पूर्ण करावे,असे स्थानिक नागरिकांकडून मागणी केली जात आहे ……..
aonenewsmaharastra@gmail.com

प्रतिनिधी सिन्नर :भाऊसाहेब हंडोरे
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......






