best news portal development company in india

सरकार कोणाचे ही येऊद्या मी कुठेही जाणार नाही अखेर पर्यंत शरदचंद्र पवार यांच्या बरोबर राहून पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात……

SHARE:

सिन्नर प्रतिनिधी – भाऊसाहेब हांडोरे.   

सिन्नर , दिनांक – २९ नोव्हेंबर …. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मुसंडी मारत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे, त्यामुळे सर्वसामान्य समाजाशी निगडीत असलेल्या सिन्नर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार गट अधिकृत उमेदवार उदय सांगळे यांच्या चुरशीची लढत झाली या लढतीत विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांनी आपला गड कायम राखला आहे, परंतु सध्या विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्या कार्यकर्ते कडून मी शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्याबरोबरचा जुना व्हिडिओ दाखवून तालुक्यातील जनतेत व माझ्यावर प्रेम करणार्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम चालू आहे,ते थांबवावं व माझ्यावर जनतेने दिलेला कौल मान्य केला असून मी पराभव स्विकारला आहे.

   त्यामुळे सर्वसामान्य समाजाशी निगडीत असलेल्या कामांना प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार उदय सांगळे यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले की सरकार कोणाचे ही येऊद्या मी कुठेही जाणार नाही अखेर पर्यंत शरदचंद्र पवार यांच्या बरोबर राहून पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली आहे.

  • त्यामुळे सर्वसामान्य समाजाची दिशाभूल केली जात आहे व अफवा पसरवून दिली जाते आहे हे चुकीचे असल्याचे श्री.सांगळे यांनी खुलासा करून आपलीं राजकीय भूमिका स्पष्ट केली.

मतदान झाल्यानंतर आभार प्रदर्शन समारंभ संपन्न झाला. त्यावेळी महायतीचे अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार व विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांनी ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या कुटुंबियांचे आभार मानले होते. तसेच सिन्नर विधानसभा निवडणुकीत कोकाटे यांनी विजय मिळवला व निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.मात्र कोकाटे यांच्या विजयी मिरवणुकीत ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे फोटो झळकली होती.

   त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला व संशायाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर अज्ञान कडून गाव बंदी चा फलक लावण्यात आला होता ग्रामपंचायतीने एकोपा टिकवण्यासाठी तातडीने फलक हटवून फलक लावणाऱ्या व समर्थकांचा निषेध व्यक्त केला आहे.
या संदर्भात श्री.सांगळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की मी आशा गोष्टीशी सहमत नाही असे कृत्य करणाऱ्यांना आशा घटना घडल्या नाही पाहिजे अशी काळजी घेतली पाहिजे.. जे झाले ते झाले आता माझ्या दृष्टीने भूतकाळ झाला आहे जे माझ्याबरोबर आहे ते व जे माझ्याबरोबर नाहीत ते सुद्धा माझ्याबरोबर यापुढे कशे येतील अशा सकारात्मक दृष्टिकोनातून सार्वजनिक जीवनात कार्यरत राहणे पसंत केले आहे त्यामुळे सर्वसामान्य समाजाशी निगडीत असलेल्या कामांना प्राधान्य दिले जाईल व विरोधात राहुन पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई