Aone News Maharastra(ANM)
नाशिक उपसंपादक
ज्ञानेश्वर सांगळे :
नाशिक येथील दिंडोरी पंचायत समितीतील वैदयकीय अधिकारी वर्ग-1 सुभाष हरीभाऊ मांडगे यांना 25 नोव्हेंबर 2024 रोजी 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
या प्रकरणातील तक्रारदार हे कोशींबे येथील सरकारी आयुर्वेद दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदारांच्या दवाखान्यासाठी 2020-2024 या कालावधीत 2,27,000 रुपये अनुदान प्राप्त झाले होते, ज्यावर कमीशन म्हणून मांडगे यांनी लाचेची मागणी केली होती.
यानंतर तक्रारदार यांनी या मागणीविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. यानुसार 28 ऑक्टोबर 2024 रोजी पडताळणी करण्यात आली होती. अखेर 25 नोव्हेंबर 2024 रोजी मांडगे यांनी 20,000 रुपये लाच घेतली, त्यावेळी त्यांना पंचांच्या साक्षीने पकडण्यात आले. त्यांच्या विरोधात म्हसरुळ पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
. उपसंपादक:-ज्ञानेश्वर सांगळे, नाशिक
aonenewsmaharastra
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





