best news portal development company in india

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने 1 ऑक्टोबर 2024 आझाद मैदान मुंबई येथे महामोर्चा

SHARE:


राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने मुंबई 1 ऑक्टोंबर 2024 आजाद मैदान मुंबई येथे प्रचंड मोठा मोर्चा……

प्रतिनिधी नाशिक: अरुण गायकवाड 

              चर्मकार समाज बांधवांना कळविण्यात येते की चर्मकार समाजाचा विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाने महासंघ संस्थापक अध्यक्ष मा. मंत्री. मा. बबनरावजी घोलप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केलेला आहे त्या संदर्भात मा. मुख्यमंत्री साहेब यांच्यासोबत बैठक घेण्यात आली होती व त्या बैठकीत सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून त्यांची अंमलबजावणी झाली नाही ती करण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांना आठवण करून देण्यासाठी मंगळवार दि.१ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता आझाद मैदान मुंबई येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चात हजारोंच्या संख्येने  समाज बांधव संपूर्ण महाराष्ट्रातून उपस्थित राहणार आहे, असे चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा. मंत्री मा. बबनरावजी घोलप साहेब यांनी समाज बांधवांना सांगितले.

या भव्य मोर्चामध्ये समाज बांधवांच्या विविध प्रकारच्या मागण्या आहेत या मागण्यासाठी तसेच मुख्यमंत्री साहेबांना आठवण करून देण्यासाठी हा भव्य मोर्चा आयोजित केला गेला आहे.

       या मोर्चासाठी विविध क्षेत्रातील समाज बांधव उपस्थित राहणार असून तसेच जिल्हा अध्यक्ष,ग्रा, जिल्हा अध्यक्ष ,महिला जिल्हा अध्यक्ष , ग्रा महिला जिल्हा अध्यक्ष युवा जिल्हा अध्यक्ष ,ग्रा जिल्हा अध्यक्ष गटाई जिल्हा अध्यक्ष ,ग्रा जिल्हा अध्यक्ष , वधु वर मंडळ जिल्हाअध्यक्ष ग्रा जिल्हा अध्यक्ष ,संपर्क प्रमुख ,तालुक़ाअध्यक्ष ,शहर अध्यक्ष ,गाव अध्यक्ष शाखा अध्यक्ष तसेच राष्ट्रीय राज्य विभागीय सर्व पद अध्यक्ष व त्यांची कार्यकारणी आणि समाज बांधव उपस्थित राहणार आहे. 

चलो मुंबई आझाद मैदान

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई