प्रतिनिधी: ए वन न्युज महाराष्ट्र, नाशिक
नाशिक :ओला, उबर आणि रॅपिडोच्या बाईक टॅक्सी सेवांविरोधात राज्यभरातील रिक्षाचालक व रिक्षा-मालक संघटनांनी एकत्र येत 10 ऑगस्ट 2026 रोजी नाशिक ते मुंबई मंत्रालय असा भव्य ‘रिक्षासह धडक मोर्चा’ काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चामध्ये महाराष्ट्रातील हजारो रिक्षाचालक सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संघटनांच्या म्हणण्यानुसार, बाईक टॅक्सी सेवेमुळे पारंपरिक रिक्षा व्यवसायावर मोठा परिणाम होत असून हजारो रिक्षाचालकांच्या रोजगारावर संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने बाईक टॅक्सी धोरणाचा पुनर्विचार करून रिक्षाचालकांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशी प्रमुख मागणी करण्यात येणार आहे.
मोर्चा 10 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8.00 वाजता मुंबई नाका, नाशिक येथून सुरू होणार असून मुंबईतील मंत्रालयावर धडक देण्यात येणार आहे. मार्गात गरवारे पॉईंट, विठ्ठलवाडी, घोटी, इगतपुरी, कसारा, शहापूर, मुलुंड नाका, सायन आणि दादर मार्गे मोर्चा मंत्रालयात पोहोचणार आहे.
या आंदोलनाचे आयोजन सर्व रिक्षा चालक-मालक संघटना, महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आले असून, राज्यातील सर्व रिक्षाचालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
संघटनांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “आज जर आपण एकत्र आलो नाही, तर उद्या आपल्या व्यवसायावर संकट अधिक गडद होईल.” त्यामुळे आपल्या हक्कांसाठी, रोजगारासाठी आणि भविष्यासाठी एकजुटीने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क:समाधान (भाऊ) अहिरे – 9011913393
नितीन (आप्पा) मूर्तडक – 8208990521

Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





