प्रतिनिधी: ए वन न्युज महाराष्ट्र,नाशिक
नाशिक:रेड स्वस्तिक सोसायटी, नाशिक शाखेची बैठक रविवार, दि. २ ऑगस्ट रोजी ऋषिराज टॉवर, विद्या विकास सर्कल, नाशिक येथे आदरणीय चेतन पटेल यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. बैठकीत सामाजिक आरोग्य उपक्रम आणि आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत १५ ऑगस्ट २०२६ रोजी मखमलाबाद येथे भव्य महाआरोग्य शिबिर आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या शिबिरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला तसेच आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
याशिवाय, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रेड स्वस्तिक सोसायटीकडून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक सेवा, स्वयंसेवकांचे नियोजन, आरोग्य सेवा आणि जनजागृती उपक्रमांबाबतही सखोल चर्चा करण्यात आली. कुंभमेळ्यात भाविकांना अधिकाधिक सेवा देता यावी यासाठी विविध समित्यांची रूपरेषा तयार करण्यावर भर देण्यात आला.
बैठकीस शाखेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी समाजोपयोगी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यकारी अध्यक्ष जे. बी. पाटील यांनी उपस्थित सदस्यांचे आभार मानत आगामी महाआरोग्य शिबिर आणि कुंभमेळा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. बैठकीचा समारोप सकारात्मक वातावरणात झाला.

Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





