best news portal development company in india

के.बी.एच. हायस्कूलमध्ये गुरु-शिष्य परंपरेला अभिवादन; कर्मवीर काकासाहेब वाघ, सहकार महर्षी माधवराव बोरस्ते व स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याला उजाळा…

SHARE:

प्रतिनिधी:गोरख कसबे,गिरणारे

  गिरणारे:मविप्र संस्थेच्या के.बी.एच. हायस्कूलमध्ये कर्मवीर काकासाहेब वाघ व सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष दिलीप रावजी थेटे होते. यावेळी माता-पालक समितीचे उपाध्यक्ष रवींद्र आत्माराम थेटे, गिरणारे ग्रामपंचायत सदस्य नामदेव गायकर, दिलीप थेटे, राजाभाऊ थेटे, शाळेचे मुख्याध्यापक नितीन भामरे यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


   कार्यक्रमात विद्यार्थिनी वैष्णवी भोर, प्राची थेटे तसेच विद्यार्थी संग्राम घुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक नितीन भामरे यांनी आपल्या मनोगतात कर्मवीर काकासाहेब वाघ व सहकार महर्षी माधवराव बोरस्ते या गुरु-शिष्यांनी शिक्षण, समाजसेवा आणि सहकार क्षेत्राच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ शिक्षक संजय नागरे यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याचा आढावा घेताना शेती, सिंचन, ग्रामीण विकास, पायाभूत सुविधा आणि राज्याच्या आर्थिक विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. निर्णयक्षमता, कामाचा वेग, शिस्तप्रियता, विनोदी स्वभाव आणि जनतेच्या प्रश्नांप्रती असलेली बांधिलकी यामुळे अजितदादा पवार यांनी सर्वसामान्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले.
   दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयाच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांना वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व यावेळी पटवून देण्यात आले.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी देवयानी कस्तुरे हिने केले, तर आभार प्रदर्शन विद्यार्थी आयुष कातड याने केले. फलक लेखन व चित्रकलेची जबाबदारी चित्रकला शिक्षिका सुनीता शेटे यांनी पार पाडली.
  कार्यक्रमासाठी शालेय समितीचे अध्यक्ष दिलीप रावजी थेटे, माता-पालक समितीचे उपाध्यक्ष रवींद्र आत्माराम थेटे, ग्रामपंचायत सदस्य नामदेव गायकर, दिलीप थेटे, राजाभाऊ थेटे, मुख्याध्यापक नितीन भामरे यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य केले.

सत्य,वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी”एवन न्युज महाराष्ट्र”

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई