best news portal development company in india

महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह कोकण आणि घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट…

SHARE:


प्रतिनिधी : एवन न्यूज महाराष्ट्र,नाशिक

नाशिक: महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, राज्यातील अनेक भागांत पुढील पाच दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला.
गुजरातच्या किनारपट्टीजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील हवामानावर परिणाम होत असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
२१ ते २६ जुलैदरम्यान राज्याच्या विविध भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नदी, नाले, धबधबे आणि धोकादायक डोंगराळ भागात जाणे टाळावे, तसेच पावसाचा जोर अधिक असताना अनावश्यक प्रवास करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.
नागरिकांनी हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष द्यावे. आवश्यक काम असल्यासच घराबाहेर पडावे, तसेच मुसळधार पावसामुळे रस्ते आणि सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी.
दरम्यान, या पावसामुळे धरणे, नद्या आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असून, स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

एवन न्यूज महाराष्ट्र — सत्य • वेगवान • विश्वासार्ह

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई