कोळपेवाडी | प्रतिनिधी : निवृत्ती पगार
देशाच्या संरक्षण क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकत शिर्डीजवळील औद्योगिक वसाहतीत भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठा तोफगोळा उत्पादन प्रकल्प उभारण्यात आला आहे. या अत्याधुनिक प्रकल्पाचे लोकार्पण येत्या २३ मे रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री Rajnath Singh यांच्या हस्ते तर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
ग्लोब फोर्ज लिमिटेड कंपनीने तब्बल २०० एकर क्षेत्रावर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला असून येथे दरवर्षी सुमारे पाच लाख १५५ मिमी तोफगोळ्यांचे उत्पादन करण्यात येणार आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि स्वदेशी संरक्षण निर्मितीला चालना देणारा हा प्रकल्प देशाच्या संरक्षण क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

शिर्डी आणि बेलवंडी परिसरात होणाऱ्या विस्तारामुळे एकूण तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे ५ हजार स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
या प्रकल्पात अत्याधुनिक आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून भविष्यात अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्त्वाचे संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळख निर्माण करणार असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष इनोव्हेशन सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
या भव्य प्रकल्पामुळे शिर्डी परिसरात औद्योगिक क्रांती घडण्याची शक्यता व्यक्त होत असून स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत राहा — एवन न्यूज महाराष्ट्र

संपादक:अरुण चंद्रभान गायकवाड,9422952513
उपसंपादक:ज्ञानेश्वर यशवंत सांगळे,9637100608

एवन न्यूज महाराष्ट्र
कोळपेवाडी
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





