: नाना सांगळे नाशिक
येवला, दि. 23 मार्च 2026 — शेतकरी प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ येवला प्रांत कार्यालयावर आज प्रहार जनशक्तीच्या वतीने जोरदार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व ज्येष्ठ शेतकरी नेते बच्चुभाऊ कडू आणि गणेश निंबाळकर यांनी केले.
मोर्चादरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयाच्या आवारात कांदे भिरकावत आपला तीव्र निषेध व्यक्त केला. बाजारभाव कोसळल्यामुळे आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. विशेषतः कांदा आणि मका पिकाच्या दरांबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे यावेळी दिसून आले.
मोर्चा प्रांत कार्यालयात पोहोचल्यावर शेतकरी व प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चुभाऊ कडू,गणेश निंबाळकर तसेच प्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना थेट भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी प्रमुख मागण्या मांडल्याकांदा आणि मका पिकाला हमीभाव जाहीर करावा
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी
संबंधित विभागातील निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी
शेतकरी समस्यांवर ठोस आणि त्वरित निर्णय घ्यावा
या आंदोलनात बच्चुभाऊ कडू आणि गणेश निंबाळकर यांनी स्वतः आघाडी घेत शेतकऱ्यांसोबत संघर्ष केला. “शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला.
जर तात्काळ निर्णय घेतला गेला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. येवला परिसरात या आंदोलनाची जोरदार चर्चा असून प्रशासनावर दबाव वाढला आहे.
येवला येथे झालेल्या या आंदोलनाने शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणले असून, प्रशासनाने यावर काय भूमिका घेतली याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सत्य वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी एवन न्यूज महाराष्ट्र

एवन न्यूज महाराष्ट्र
नाशिक
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





