Aone News Maharastra (ANM)
प्रतिनिधी सिन्नर: भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर:- राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिन्नर मतदार संघात वेगवेगळ्या मार्गाने सर्वच पक्षाच्या उमेदवार मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या कॉमिन्युस्ट पक्षाने उमेदवार जाहीर केली आहे,तसेच विद्यमान आमदार कोकाटें यांनी यांनी ही आपली उमेदवारी निश्चित समजून जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रहार जनशक्ती संघटनेच्या व स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरु आहे.. तर खासदार राजाभाऊ वाजे यांच्या गटाचे नेते श्री उदय सांगळे यांनी बंडाचा झेंडा घेऊन हाती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्यी तुतारी हाती घेण्यात येणार असल्याचे दिसते आहे. तर दुसरीकडे स्वराज्य पक्ष तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांनी ही निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच ठाकरे यांच्या गटाने तालुक्यांत महिला उमेदवारांची चाचपणी सुरू केली होती परंतु उमेदवार देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत,त्यातील आमदार माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे, तसेच याच पक्षाचे नेते राजेश गडाख यांनी सुद्धा आपण इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.
.
या विधानसभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘ना आघाडी .. ना युती’.. असे मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे,त्यामुळे सिन्नर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात जिल्हा उपाध्यक्ष अमोल जाधव यांच्या नावाची शिफारस केली आहे.त्यामुळे तालुक्यात उमेदवारांची भाऊगर्दीत पहावयास मिळत असल्याचे चित्र आहे..
तसेच सिन्नर विधानसभेत कोणाला उमेदवारी मिळणार.. विरोधक कोण आणि किती असणार याकडे लक्ष न देता विद्यमान आमदार श्री माणिकराव कोकाटे हे आपल्या प्रचाराची रणनिती आखत असुन तालुक्यातील पुर्व भागातील गावांना काॅर्नर बैठका घेण्यास सुरुवात केली आहे .
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेश अध्यक्षा कुमारी संध्या सोणवणे यांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट दिली आहे. तसेच तालुक्यातील मलडोण, सायाळे काॅर्नर बैठका घेतल्या आहेत. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन कुमारी संध्या सोणवणे यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सांगितले. याप्रसंगी जिल्हा परिषद समिती सदस्य, कोकाटे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी भाऊसाहेब हंडोरे सिन्नर
aonenewsmaharashtra@gmail.com
जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क :-९४२२९५२५१३
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





