प्रतिनिधी राळेगाव:-
अशोक मारुती मेश्राम ( मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक)
शोषित पीडित अन्यायग्रस्त शेतकरी शेतमजूर छोटे व्यावसायिक यांना न्याय देणारा उमेदवार म्हणून राळेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्व जनतेमध्ये चर्चेला आहे.
मौजे किनी जवादे येथील मूळ रहिवासी असलेले अशोक मारुती मेश्राम हे नोकरी लागल्यावर शहरात सेवा देण्यासाठी गेले, परंतु त्यांची ओढ मात्र नेहमी जन्म भूमीशी लागलेली होती, सेवेत असताना सुद्धा ते कौटुंबिक कार्यासाठी मूळ गावला येत असे आणि राळेगाव तालुक्यातील नातेवाईक दोस्त मंडळी व सामाजिक जबाबदारी म्हणून नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने समाजाला मदत करीत होते “मी जसा खेड्यातून मोठा झालो तसेच माझे ग्रामीण भागातील नातेवाईक दोस्त मंडळी माझ्या जन्मभूमीतील जनता सुशिक्षित व मोठी व्हावी त्यांना सुद्धा सुंदर जीवन मिळावं “या नात्याने ते सामाजिक ऋण फेडण्याच्या विचारात अशोक मारुती मिश्रा यांनी नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यावर आपण आपल्या माय भूमीची सेवा करावी मायभूमीत वसणारे सर्व बांधव मग ते कोणत्याही जाती-धर्माचे का असेना त्यांना सुद्धा न्याय देता यावा यासाठी त्यांनी राजकीय जीवनामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, व व्यापक विचारधारा असलेल्या काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी अर्ज भरून उमेदवारी मागितली त्याचबरोबर मतदार संघामध्ये जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा, त्यांच्या समस्या जाणून घेण्याचं ,त्यांना मदत करण्याचं व्रत स्वीकारलं आणि गावागावांमध्ये जाऊन अख्खा मतदारसंघ पिंजून काढला त्यांच्या समस्या जाणून त्यावर उपाय करण्याचा काढण्याचा प्रयत्न केला, ते आज जनतेमध्ये सर्वश्रुत झाले आहे, जनता आज राळेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये अशोक मारुती मेश्राम हाच उमेदवार आम्हाला हवा अशी मागणी करीत आहे ,काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी अशोक मारुती मेश्राम यांना उमेदवारी देऊन जनतेला उपकृत करावे असा सूर राळेगाव विधानसभा मतदारसंघात सर्वत्र ऐकायला येत आहे . काँग्रेस पक्षाने या बाबीला हेरून एक विजयी उमेदवार म्हणून अशोक मारुती मेश्राम याची उमेदवारी निश्चित करावी असा सूर मतदार संघातून ऐकायला येत आह…..
जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क:-9422952513
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





