प्रतिनिधी: एवन न्युज महाराष्ट्र ,नाशिक
नाशिक:के. के. वाघ शिक्षण संस्था व मुक्तांगण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गुरू-शिष्य स्मृती स्पर्धा वर्ष ४३’ अंतर्गत विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ३१ जुलै ते २२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत नाशिकमधील के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांमध्ये या स्पर्धा रंगणार आहेत.
या स्पर्धांमध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि भारतीय संस्कृती, कला व परंपरेचे जतन व्हावे हा प्रमुख उद्देश आहे. स्पर्धांसाठी विविध विषयांचे तज्ज्ञ परीक्षक व समन्वयक नियुक्त करण्यात आले असून सहभागी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
स्पर्धांमध्ये रांगोळी, मेंदी, चित्रकला, राष्ट्रीय नृत्य, शिल्पकला, वक्तृत्व, स्टँड-अप इम्प्रोव्हायझेशन, समूह स्वर (ग्रामीण विभाग), स्वरपठण, वादविवाद, एकपात्री नाट्य प्रवेश, कथन/कथाकथन, गायन (ग्रामीण व शहरी विभाग), वाद्यवादन (पाश्चात्य व भारतीय), समूह नृत्य (शहरी विभाग) तसेच शास्त्रीय गायन अशा विविध प्रकारांचा समावेश आहे.
स्पर्धांचे आयोजन के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांमध्ये करण्यात आले असून प्रत्येक स्पर्धेसाठी स्वतंत्र समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयोजकांनी सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळापत्रकानुसार सहभाग नोंदवून स्पर्धांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी आयोजकांनी संपर्क क्रमांक तसेच gurushishyaspardha2024@kkwagh.edu.in हा ई-मेल उपलब्ध करून दिला आहे.
समन्वयक:
डॉ. व्ही. एम. ससेवळकर
समन्वयक, गुरू-शिष्य स्मृती स्पर्धा
के. के. वाघ शिक्षण संस्था, सरस्वतीनगर कॅम्पस, नाशिक.

Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





