आमदार सरोजताई बाबुलाल अहिरे यांच्या पुढाकारातून तज्ज्ञ डॉक्टरांकडून ग्रामस्थांची आरोग्य तपासणी…
प्रतिनिधी : गोरख कसबे,ए वन न्युज महाराष्ट्र ,गिरणारे
गिरणारे (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा त्यांच्या परिसरातच उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आमदार सरोजताई बाबुलाल आहिरे यांच्या पुढाकारातून आणि एस.एम.बी.टी. हॉस्पिटल, नाशिक यांच्या सहकार्याने गिरणारे येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला गिरणारेसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या आरोग्य शिबिरामध्ये हृदयरोग, मधुमेह, नेत्ररोग, कान-नाक-घसा, स्त्रीरोग तसेच बालरोग यांसह विविध आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. रुग्णांना त्यांच्या आजाराबाबत आवश्यक मार्गदर्शन तसेच प्राथमिक उपचार देण्यात आले. गंभीर अथवा पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.
ग्रामीण भागातील नागरिकांना अनेकदा वेळेअभावी किंवा आर्थिक अडचणींमुळे तज्ज्ञ वैद्यकीय सेवा घेणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत गावाच्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणी व तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळाल्याने नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. या शिबिरामुळे नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यासही मोठी मदत झाली.
या उपक्रमासाठी दिलीप थेटे, शशी आप्पा थेटे, सरपंच वडगाव आवी कसबे, निलेश कसबे, विलास कसबे, खंडू पाटील कसबे, नामदेव गैकर, बापूकाका थेटे, गिरनारे उपसरपंच, शरद फडोल, संजय थेटे (समाजसेवक), पत्रकार गोरख कसबे (वाडगाव) तसेच गिरणारे व परिसरातील ग्रामस्थांचे मोठया संख्येने विशेष सहकार्य लाभले.
शिबिराचा लाभ घेण्यासाठी गिरणारे तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत उपयुक्त आणि कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.


ए वन न्युज महाराष्ट्र
गिरणारे, ता. जि. नाशिक.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





