best news portal development company in india

बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये ६० कोटी ७४ लाखांच्या आर्थिक अपहाराचा आरोप; माजी पदाधिकाऱ्यांसह संबंधितांवर गुन्हा दाखल…

SHARE:

कोल्हापूर प्रतिनिधी : एवन न्यूज महाराष्ट्र

कोल्हापूर:महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) येथील संत सद्गुरु बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये तब्बल ६० कोटी ७४ लाख रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. धर्मादाय विभागाच्या लेखापरीक्षण आणि चौकशी अहवालातील निष्कर्षांच्या आधारे या प्रकरणी भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   धर्मादाय आयुक्त मुख्यालय, मुंबई येथील देवस्थान शाखेचे निरीक्षक रंगराव गडकरी यांनी रविवारी रात्री उशिरा भुदरगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर ट्रस्टच्या तत्कालीन कार्याध्यक्षा रागिणी खडके, सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्यासह ट्रस्टचे संबंधित सदस्य आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांविरुद्ध विविध आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
    आलेल्या माहितीनुसार, मार्च २०२० ते मार्च २०२६ या कालावधीतील ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप आहे. धर्मादाय विभागाकडून करण्यात आलेल्या चौकशीत आर्थिक व्यवहार, निधीचा वापर आणि ट्रस्टच्या कारभाराशी संबंधित विविध बाबींची तपासणी करण्यात आली. या तपासणीतून समोर आलेल्या निष्कर्षांच्या आधारे ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
     संत सद्गुरु बाळूमामा देवस्थान हे महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे देवस्थानला भाविकांकडून मिळणाऱ्या देणग्या आणि ट्रस्टच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांबाबत या प्रकरणामुळे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ६० कोटी ७४ लाख रुपयांच्या कथित आर्थिक अपहाराच्या आरोपांची पोलिसांकडून सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे.
    दरम्यान, या प्रकरणात नेमका किती निधी कोणत्या पद्धतीने आणि कोणाच्या माध्यमातून वळविण्यात आला, या आर्थिक गैरव्यवहारामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच संबंधित आर्थिक व्यवहारांची संपूर्ण पार्श्वभूमी काय आहे, याचा तपास आता पोलिसांकडून केला जाणार आहे.
    या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच निश्चित होईल. मात्र, कोट्यवधी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहारामुळे बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या कारभारावर आणि आर्थिक व्यवस्थापनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सत्य,वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी“एवन न्यूज महाराष्ट्र”

सत्य,वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी”एवन न्यूज महाराष्ट्र”
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई