best news portal development company in india

पंढरपूरच्या अन्नत्याग आंदोलनाला सिन्नरचा ठाम पाठिंबा; रोहित पवारांना विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती भेट…

SHARE:

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,”एवन न्युज महाराष्ट्र”,सिन्नर

————————————————————-
सिन्नर, दि. १५ जून (प्रतिनिधी) – पंढरपूर येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आमरण अन्नत्याग आंदोलनाला सिन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जाहीर आणि ठाम पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करणारे आमदार रोहित पवार यांची पंढरपूर येथे भेट घेऊन सिन्नर तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रत्यक्ष पाठिंबा दर्शविला.
     यावेळी सिन्नर तालुक्यातील शेतकरी व पक्ष पदाधिकाऱ्यांनी रोहित पवार यांना विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट देत त्यांच्या शेतकरी न्यायाच्या लढ्याला शुभेच्छा दिल्या. शेतकरी हितासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला पांडुरंगाचे आशीर्वाद लाभावेत आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून न्याय द्यावा, अशी प्रार्थना विठ्ठल-रुक्मिणी चरणी करण्यात आली.
      सिन्नर तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील यांनी सांगितले की, राज्यातील शेतकरी आज आर्थिक संकटात सापडला असून त्याला दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला सिन्नर तालुक्यातील शेतकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे.
       या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सिन्नरमधून गेलेल्या शिष्टमंडळाला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, निरीक्षक भुसारा साहेब आणि खासदार भगरे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. शेतकरी हिताच्या लढ्यात सिन्नर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
      यावेळी शिवाजी गुंजाळ, राधाकृष्ण वाजे, चिंधु गुंजाळ, भगीरथ पवार, जयाजी पगार, संभाजी कोकाटे यांच्यासह अनेक शेतकरी व पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.


          पंढरपूर येथे सुरू असलेल्या या आंदोलनामुळे राज्यभरातील शेतकरी संघटना आणि विविध सामाजिक घटकांचे लक्ष वेधले गेले असून शेतकरी प्रश्नांबाबत सरकारची भूमिका काय राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी रोहित पवार यांच्या आंदोलनाला दिलेला पाठिंबा हा शेतकरी एकजुटीचे प्रतीक मानला जात आहे.

सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी “एवन न्युज महाराष्ट्र” संपादक: अरुण चंद्रभान गायकवाड, उपसंपादक: ज्ञानेश्वर यशवंत सांगळे 9422952513/9637100608
प्रतिनिधी: भाऊसाहेब हांडोरे
“एवन न्युज महाराष्ट्र “
सिन्नर.
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई