best news portal development company in india

नैताळे गाव हादरले! तीन ठिकाणी चोरीची मालिका; ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण, रोकड व सोन्याचे दागिने लंपास..

SHARE:


प्रतिनिधी | एवन न्युज महाराष्ट्र,निफाड

नैताळे:नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नैताळे गावात अज्ञात चोरट्यांनी एका रात्रीत तीन ठिकाणी धाडसी चोरी करत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. या घटनेत साहेबराव शिवराम तुपलोंढे यांना मारहाण करून त्यांच्या घरातील रोकड व सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास साहेबराव तुपलोंढे यांच्या घरात प्रवेश केला. चोरीला विरोध केल्याने अथवा जाग आल्याने चोरट्यांनी त्यांना बेदम मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. या मारहाणीत ते जखमी झाले असून त्यांच्या घरातील रोकड आणि सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले.
याचबरोबर गावातील दादा बाबुराव बोरगुडे यांच्या घरातही चोरट्यांनी हात साफ करत मौल्यवान दागिने चोरल्याची माहिती समोर आली आहे. तसेच गावातील आणखी एका ठिकाणी चोरी झाल्याने एकाच रात्रीत तीन ठिकाणी झालेल्या या घटनांनी नागरिकांमध्ये प्रचंड चिंता व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच निफाड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयितांची माहिती आणि इतर पुरावे तपासले जात आहेत.
गावात सलग घडलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे रात्रीच्या गस्तीत वाढ करावी तसेच चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणातील नेमकी चोरीची रक्कम, दागिन्यांची किंमत आणि तिसऱ्या चोरीच्या घटनेचे तपशील पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहेत. निफाड पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत असून आरोपींना लवकरच जेरबंद केले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

संपादक : अरुण चंद्रभान गायकवाड,
उपसंपादक: ज्ञानेश्वर यशवंत सांगळे,
Aone News Maharashtra


— संपादक : अरुण चंद्रभान गायकवाड, Aone News Maharashtra

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई