प्रतिनिधी: एवन न्युज महाराष्ट्र,नाशिक
नाशिक: जिल्ह्यातील चांदवड येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज मोठा संघर्ष पाहायला मिळाला. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी चांदवड चौफुलीवर आक्रोश मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात हजारो कांदा उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या वाढत्या संतापाची दखल घेत राज्य सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्या असून उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दिल्ली येथे बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व अंबादास दानवे, रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे तसेच खासदार भास्करराव भगरे यांनी केले. आंदोलन उग्र होत असल्याचे लक्षात येताच चांदवड पोलीस यांनी सर्व प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे आंदोलक शेतकऱ्यांमध्ये अधिक संताप निर्माण झाला.
नेत्यांच्या अटकेनंतर शिवसेनेचे निफाड तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील आणि माजी आमदार सुनील भुसारा यांनी शेतकऱ्यांसह रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू करत आक्रमक भूमिका घेतली. पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले, मात्र काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

या कांदा उत्पादक शेतकरी महामोर्चात माजी आमदार अनिल कदम, खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख नितीन दादा आहेर, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, राष्ट्रवादी युवकचे निफाड तालुकाध्यक्ष भूषण शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
तसेच गोदाकाठ भागातील पुंजा भगुरे, समाधान वाघ, सागर जाधव, राजेंद्र राजोळे, योगेश राजोळे, धोंडू पवार आणि राहुल घुगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला.
कांद्याला हमीभाव, निर्यात धोरणातील स्थिरता आणि शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. चांदवडमधील या आंदोलनामुळे राज्याच्या राजकारणातही मोठी खळबळ उडाली असून सरकारसमोर कांदा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

संपादक:अरुण चंद्रभान गायकवाड 9422952513
उपसंपादक:ज्ञानेश्वर यशवंत सांगळे 9637100608
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





