best news portal development company in india

मायगाव देवी यात्रेत भक्तांचा जनसागर; वेळापूरच्या मानाच्या रथाची भव्य मिरवणूक, नवस लोटांगण-पायघड्यांनी पूर्ण…

SHARE:


प्रतिनिधी : निवृत्ती पगार,कोळपेवाडी
कोपरगाव तालुक्याच्या पश्चिमेस सुमारे वीस-पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मायगाव येथील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध श्री रेणुका देवी मंदिर, मायगाव येथे पार पडलेल्या वार्षिक यात्रेत यंदा भक्तांचा अक्षरशः जनसागर उसळला. श्रद्धा, परंपरा आणि भक्तीभाव यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळालेल्या या सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.


चैत्र पौर्णिमेनंतरच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या या यात्रेनिमित्त सकाळपासूनच भाविकांची गर्दी मंदिर परिसरात वाढू लागली होती. महिलांसह अनेक भक्तांनी देवीसमोर लोटांगण घालत तसेच पायघड्यांनी नवस फेडला. काहींनी देवीला नैवेद्य अर्पण करून खजुराची उधळण करत आपली मनोकामना पूर्ण झाल्याची कृतज्ञता व्यक्त केली.


यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरली ती वेळापूर येथील गोरे वस्तीवरील मानाच्या रथाची भव्य मिरवणूक. दुपारी दोन वाजता वेळापूर येथून निघालेला हा रथ सायंकाळी सहा वाजता मायगाव देवी मंदिरात दाखल झाला. मार्गभर भाविकांनी ‘जगदंबा माते की जय’च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून सोडले होते. ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या भाविकांमुळे मिरवणूक अत्यंत देखणी आणि भक्तिमय वातावरणात पार पडली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविकांनी या यात्रेत सहभाग घेत परंपरा जपली. मायगाव देवी यात्रेचा हा सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता परिसरातील गावांच्या सांस्कृतिक ऐक्याचे आणि श्रद्धेचे प्रतीक ठरला.

सत्य,वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी “एवन न्यूज महाराष्ट्र”संपादक: अरुण चंद्रभान गायकवाड- 9422952513,,उपसंपादक: ज्ञानेश्वर यशवंत सांगळे,9637100608 “एवन न्यूज महाराष्ट्र”
प्रतिनिधी:निवृत्ती पगार
एवन न्यूज महाराष्ट्र
कोळपेवाडी
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई