ज्ञानेश्वर सांगळे, एवन न्यूज महाराष्ट्र,नाशिक
नाशिक : महाराष्ट्राच्या सर्वांगीण आणि संतुलित विकासासाठी केंद्र सरकारने राज्याला विशेष आर्थिक सहाय्य व विकास पॅकेज जाहीर करावे, अशी ठाम मागणी खासदार भास्करराव भगरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक सर्वेक्षण 2024–25 व 2025–26 अहवालानुसार राज्याची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मजबूत अर्थव्यवस्थांपैकी एक असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याचे एकूण राज्यांतर्गत उत्पादन (GSDP) सुमारे 46 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक असून आर्थिक वाढीचा दर 7 टक्क्यांपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उद्योग, सेवा, व्यापार, वित्तीय क्षेत्र, परकीय गुंतवणूक आणि कर महसुलामध्ये महाराष्ट्राचा देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मात्र, या सकारात्मक चित्रासोबत काही गंभीर आर्थिक आव्हानेही पुढे आली आहेत. सध्या राज्यावर 7 ते 8 लाख कोटी रुपयांपर्यंत सार्वजनिक कर्जाचा भार असल्याचे आर्थिक सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. ग्रामीण पायाभूत सुविधा, सिंचन व्यवस्था, कृषी मूल्यसाखळी आणि प्रादेशिक संतुलित औद्योगिक विकासासाठी मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता असल्याचेही अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.
विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये विकासाच्या दृष्टीने अजूनही अनेक अडचणी कायम आहेत. या भागांमध्ये सिंचन सुविधा, दळणवळण व्यवस्था, औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढविणे अत्यंत आवश्यक असल्याचे खासदार भगरे यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर खासदार भगरे यांनी केंद्र सरकारकडे काही महत्त्वाच्या केल्या आहेत त्या अश्या की,
महाराष्ट्रासाठी विशेष आर्थिक विकास पॅकेज जाहीर करणे
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र प्रादेशिक विकास निधी निर्माण करणे
राष्ट्रीय महामार्ग, औद्योगिक कॉरिडॉर, लॉजिस्टिक पार्क, बंदरे, मेट्रो रेल व मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट प्रकल्पांसाठी केंद्राकडून वाढीव निधी,दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या सिंचन व जलसंवर्धन प्रकल्पांना विशेष आर्थिक मदत,कृषी प्रक्रिया उद्योग आणि कृषी निर्यात क्लस्टर विकसित करणे,स्टार्टअप व औद्योगिक क्लस्टर विकास कार्यक्रमांचा विस्तार,आदिवासी व ग्रामीण जिल्ह्यांसाठी आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास व उपजीविका योजनांसाठी वाढीव निधी,हरित ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहन उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स व प्रगत तंत्रज्ञान उद्योगांना प्रोत्साहन
खासदार भगरे यांनी सांगितले की, महाराष्ट्र हा देशाच्या आर्थिक प्रगतीचा प्रमुख इंजिन आहे. राज्यातील पायाभूत सुविधा, शेती, उद्योग आणि रोजगार क्षेत्र अधिक मजबूत झाले तर त्याचा थेट फायदा संपूर्ण देशाच्या आर्थिक विकासाला होईल.
त्यामुळे केंद्र सरकारने या प्रस्तावांचा सकारात्मक विचार करून महाराष्ट्रासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी अपेक्षा खासदार भास्करराव भगरे यांनी व्यक्त केली आहे.

एवन न्यूज महाराष्ट्र
नाशिक
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





