Aone News Maharashtra
प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे सिन्नर
इगतपुरी तालुक्यातील शेणीत येथील 17 वर्षीय साहिल भाऊराव जाधव हा मुलगा दारणा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेला असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेला तीन दिवस उलटूनही साहिलचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
मुलाचा शोध घेण्यासाठी ग्रामस्थांनी गेल्या तीन दिवसांपासून नदीकाठावर मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवली, मात्र अद्याप त्याचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही. प्रशासनाकडून पाठविण्यात आलेली बोट नादुरुस्त असल्याचा तसेच त्यात पेट्रोल नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे शोधकार्याला विलंब झाल्याचा रोष नागरिकांनी व्यक्त केला.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ व नातेवाईकांनी ११ मार्च रोजी शेणीत फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांनी केले. त्या राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कन्या आहेत. आंदोलनादरम्यान त्यांनी प्रशासनाला धारेवर धरत शोधमोहीम तातडीने आणि प्रभावीपणे राबविण्याची मागणी केली.
स्थानिक महिलांनी देखील प्रशासनावर प्रश्न उपस्थित करत सांगितले की, “वरून पाणी बंद केल्याचे सांगितले जाते, पण नदीत अजूनही प्रवाह जोरात आहे. मग पाणी येते कुठून?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासनाने तातडीने प्रभावी शोधमोहीम राबवून साहिलचा शोध लावावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

एवन न्यूज महाराष्ट्र
सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





