best news portal development company in india

नाशिकमध्ये ३०० कोटींचा घरकुल घोटाळा उघड..!,,,५००० गरीब कुटुंबांच्या घरांवर बिल्डरांचा डल्ला; ४९ प्रकल्पांवर गुन्हा दाखल…

SHARE:

नाशिक | प्रतिनिधी – Aone News Maharashtra

नाशिक शहरात गृहनिर्माण क्षेत्रातील एक मोठा आणि धक्कादायक घोटाळा समोर आला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) राखीव असलेल्या हजारो घरांचा गैरव्यवहार करून बिल्डरांनी तब्बल ३०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ४९ प्रकल्पांतील जमीनमालक आणि विकासकांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
शासकीय नियमानुसार ४००० चौ.मी. पेक्षा मोठ्या भूखंडांवर उभारल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये २० टक्के घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) आणि अल्प उत्पन्न गटासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. ही घरे शासनाच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना उपलब्ध करून देण्याचा नियम आहे.
मात्र नाशिकमधील अनेक प्रकल्पांमध्ये हा नियम धाब्यावर बसवण्यात आला. सुमारे ५ हजार राखीव सदनिका म्हाडाकडे न देता त्या खासगीरित्या विक्री केल्याचा आरोप असून, त्यामुळे हजारो गरीब कुटुंबांचे घराचे स्वप्न धुळीस मिळाले.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, काही विकासकांनी नियम टाळण्यासाठी विविध प्रकारचे गैरप्रकार केल्याचा आरोप आहे.
बनावट शिक्के व सही वापर करून भूमी अभिलेख कार्यालयाचे खोटे नकाशे तयार करण्यात आले.
मोठ्या भूखंडांचे कागदोपत्री छोटे तुकडे दाखवून २० टक्के राखीव घरांचा नियम टाळण्याचा प्रयत्न केला.
२०१३ पूर्वी जमिनीचे पोटहिस्से झाले असल्याचा बनाव दाखवत तहसील कार्यालयात कागदपत्रे सादर करण्यात आली.
या सर्व प्रकारामुळे शासनाची दिशाभूल करून प्रकल्पांना मंजुरी मिळवल्याचा आरोप आहे.
नाशिक महापालिका हद्दीतील अनेक भागांमधील प्रकल्प या तपासात समोर आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने खालील भागांचा समावेश आहे:
म्हसरूळ,विहितगाव,वडनेर,दुमाला,देवळाली,आगारटाकळ,आडगाव,नांदूर-दसक,पंचक,गंगापूर,चेहेडी,नाशिक शहर परिसर
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी संबंधित सर्व्हे नंबरवर (जमिनीवर) गुन्हे दाखल केल्याची माहिती मिळत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या समितीने १०८ प्रकरणांची तपासणी केली असता त्यापैकी ४९ प्रकरणांत गंभीर अनियमितता आढळली.
या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, संबंधित विकासक आणि जमीनमालकांवर पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तपास पुढे जात असताना संबंधित बिल्डर, जमीनमालक आणि अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. तसेच या प्रकरणात जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Aone News Maharashtra या प्रकरणावर लक्ष ठेवून असून पुढील घडामोडी आणि संबंधित प्रकल्पांची यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई