best news portal development company in india

सिन्नरचा 1350 मेगावॅट औष्णिक प्रकल्प पुन्हा सुरू; महाजनको-एनटीपीसी अधिग्रहणानंतर 1 मार्चपासून वीज निर्मितीला वेग

SHARE:

प्रतिनिधी :भाऊसाहेब हांडोरे, सिन्नर
सिन्नर औद्योगिक वसाहतीतील मुसळगाव येथील 5×270 मेगावॅट क्षमतेचा (एकूण 1350 मेगावॅट) कोळसा-आधारित औष्णिक विद्युत प्रकल्प अखेर पुन्हा कार्यरत होत असून रविवार, 1 मार्च 2026 पासून वीज निर्मितीला सुरुवात होणार आहे. एनटीपीसी लिमिटेड आणि महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (महाजनको) यांच्या कन्सोर्टियमने 24 फेब्रुवारी 2026 रोजी सिन्नर थर्मल पावर लिमिटेडचे अधिग्रहण पूर्ण केल्याची माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली आहे.
कंपनीच्या 25 फेब्रुवारी 2026 च्या निवेदनानुसार हे अधिग्रहण NCLT मान्य ठराव योजनेअंतर्गत, Insolvency and Bankruptcy Code, 2016 मधील कॉर्पोरेट दिवाळखोरी निवारण प्रक्रियेचा भाग म्हणून पूर्ण करण्यात आले. त्यामुळे दीर्घकाळ बंद असलेला प्रकल्प नव्या व्यवस्थापनाखाली पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
15 मार्च 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प महाजनकोकडे हस्तांतरित करत निधीची तरतूद केली होती. त्या निर्णयानंतर अधिग्रहणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण झाली आणि अखेर प्रकल्प पुन्हा कार्यान्वित होऊ लागला आहे.
या व्यवहारानंतर एनटीपीसी समूहाची एकूण स्थापित वीज निर्मिती क्षमता 88.132 गीगावॅटवर पोहोचली असून व्यावसायिक क्षमता 87.052 गीगावॅटपर्यंत वाढल्याचे कंपनीने जाहीर केले. त्यामुळे राज्यासह देशाच्या वीज पुरवठा व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.
दरम्यान, सिन्नर एमआयडीसीतील इंडियाबुल्सकडे वापराविना पडून असलेली सुमारे 1500 एकर जमीन शासनाने ताब्यात घेऊन ती इतर उद्योगांना द्यावी, अशी जोरदार मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी अधिवेशनात केली.
2007 मधील भूसंपादनावेळी शेतकऱ्यांना रोजगार व विकासाची आश्वासने देण्यात आली होती; मात्र प्रकल्प बंद पडल्याने ती अपूर्णच राहिली. नव्या उद्योगांमुळे शेतकरी कुटुंबातील युवक-युवती आणि स्थानिक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा मुद्दा त्यांनी मांडला. तसेच शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पर्यायी धोरण व पुनर्वसन उपाय तातडीने जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली.
सिन्नर परिसर औद्योगिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उपलब्ध जमीन, पायाभूत सुविधा आणि स्पष्ट धोरणात्मक निर्णयांची सांगड घालणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. रोजगार निर्मिती, औद्योगिक वाढ आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
सत्य वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी एवन न्यूज महाराष्ट्र                        Aone  News  Maharashtra

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे
एवन न्यूज महाराष्ट्र
सिन्नर

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई