best news portal development company in india

सिन्नरमध्ये प्रशासनाविरोधात प्रहारचा एल्गार…
“केवळ दिव्यांगालाच लक्ष्य करू नका; हिंमत असेल तर संपूर्ण NH 160 वरील अतिक्रमणे काढा!”

SHARE:



प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर 

दि. 16 फेब्रुवारी 2026

पांगरी (ता. सिन्नर) येथील एका दिव्यांग बांधवाच्या व्यवसायावर कारवाईच्या पार्श्वभूमीवर प्रहार दिव्यांग संघटनेने प्रशासनाविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. “जर प्रशासनाला केवळ गरीब आणि दिव्यांगांचीच दुकाने दिसत असतील, तर आता संपूर्ण NH 160 (नाशिक–शिर्डी महामार्ग) वरील सर्व धनदांडग्यांची अतिक्रमणेही तात्काळ काढावीत,” असा थेट इशारा संघटनेने दिला आहे.
प्रहार दिव्यांग संघटनेचे सिन्नर तालुकाध्यक्ष अरुण भाऊ पाचोरे, दत्तात्रेय लोंढे, गणपत नाटे व वैभव वेलजाळी यांनी संयुक्त प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रशासनावर दुजाभावाचा आरोप केला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
पांगरी येथील श्री. खैरे या दिव्यांग व्यक्तीस व्यवसायासाठी पर्यायी जागा देण्याचे आश्वासन ग्राम प्रशासनाने दिले होते. मात्र, आजपर्यंत त्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
दरम्यान, National Highways Authority of India (NHAI) च्या संभाव्य कारवाईपासून वाचवण्यासाठी युवानेते निखिल भाऊ भेंडाळे यांनी मध्यस्थी करत प्रशासनाला वेळ देण्याची विनंती केली होती. परंतु, सरपंच व ग्रामसेवक यांनी दिलेल्या वेळेनंतरही कार्यालयात अनुपस्थित राहून संबंधित दिव्यांग बांधवाचे फोन न उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर संघटनेत तीव्र नाराजी व्यक्त होत असून, प्रशासनाची भूमिका ‘अडमुठी आणि अशोभनीय’ असल्याची टीका करण्यात आली आहे.
“धनदांडग्यांवर कारवाई करताना हात का थरथरतात?”
दत्तात्रेय लोंढे यांनी प्रशासनावर थेट सवाल उपस्थित करत म्हटले की, “हायवेवर केवळ छोट्या-छोट्या दुकानांवरच कारवाई होते का? NH 160 वर अनेक ठिकाणी मोठ्या रथी-महारथींची अतिक्रमणे आहेत. तिथे कारवाई करताना प्रशासनाचे हात का थरथरतात? जर पांगरीतील दिव्यांगावर अन्याय झाला, तर आम्ही उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू आणि संपूर्ण महामार्गावरील एक-एक अतिक्रमण काढून घेऊ.”
संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, भेदभावपूर्ण कारवाई झाल्यास न्यायालयीन लढाई उभारण्यात येईल.
बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत महामोर्चाची तयारी
या प्रश्नावर आता संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रहार संघटना लवकरच Bachchu Kadu यांच्या उपस्थितीत सिन्नर येथे महामोर्चा काढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
निखिल भाऊ भेंडाळे यांनी गावातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती केली होती. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
या संपूर्ण प्रकरणात ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. मात्र, दिव्यांग बांधवावर कारवाई केल्यास व्यापक आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आल्याने सिन्नर तालुक्यात वातावरण तापण्याची शक्यता आहे.
आता लक्ष संपूर्ण NH 160 वरील अतिक्रमणांकडे वळणार का?
की प्रशासन फक्त दुर्बलांवरच कारवाई करणार ? या प्रश्नाचे उत्तर पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे
एवन न्यूज महाराष्ट्र
सिन्नर
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई