सिन्नर | प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे दि. 7 फेब्रुवारी 2026
सिन्नर:ग्रामीण भागातील मंदिरांमध्ये सुरू असलेल्या चोऱ्यांच्या मालिकेमुळे भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच सिन्नर तालुक्यातील कारवाडी येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्रातील चोरी प्रकरणाचा वावी पोलिसांनी यशस्वीपणे पर्दाफाश केला आहे. सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी आरोपीला अटक करून चोरीस गेलेले मौल्यवान साहित्य हस्तगत केले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी कारवाडी येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीतील रक्कम, तांबे-पितळे व चांदीचे पूजेचे साहित्य तसेच तब्बल सात किलो वजनाच्या व तीन फूट लांबीच्या दोन पितळी समया चोरून नेल्या होत्या. या घटनेमुळे स्वामी भक्तांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती.
या प्रकरणी मंदिराचे सेवेकरी विकास अशोक जाधव यांनी वावी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर वावी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत सीसीटीव्ही व्हिडिओंचा सखोल अभ्यास सुरू केला.
पोलीस अधीक्षक (ग्रामीण, नाशिक) बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (निफाड) के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांनी विशेष तपास पथक स्थापन केले.
या पथकातील पोलीस अंमलदार गणेश पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मच्छिंद्र संपत वाघ (वय 47, रा. माहेगाव देशमुख, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) यास ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिल्यानंतर माहेगाव देशमुख येथील स्मशानभूमीजवळ लपवून ठेवलेल्या दोन पितळी समया पोलिसांनी हस्तगत केल्या.
आरोपीने यापूर्वी इतर ठिकाणीही अशाच प्रकारच्या मंदिर चोऱ्या केल्या असण्याचा पोलिसांना संशय असून त्याबाबत सखोल तपास सुरू आहे. आरोपीस न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद सरोवर, पोलीस निरीक्षक विजय कोठावळे, दत्तात्रय कोळपे, शहाजी शिंदे, गणेश पवार, सागर सारंगधर, तुषार दयाळ, बाळासाहेब सानप, विक्रम लगड यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
वावी पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे स्वामी भक्तांमध्ये समाधान व्यक्त होत असून मंदिर सुरक्षेबाबत पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

एवन न्यूज महाराष्ट्र
सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





