प्रतिनिधी:नाशिक”ए वन न्यूज महाराष्ट्र“


नाशिक:”सेवा ही धर्म है” हे ब्रीदवाक्य घेऊन मानवतेला समर्पित असलेली आणि जागतिक स्तरावर आरोग्य क्षेत्रात भारतीय संस्कृतीचे प्रतीक स्वस्तिक घेऊन जगभर काम करत असलेली रेड स्वस्तिक सोसायटी शाखा नाशिक यांची बैठक नाशिक शहरात उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाली. रेड स्वस्तिक सोसायटीने आरोग्य क्षेत्रात काम करत असतानाच आतापर्यंत गेल्या 24 वर्षात भारतभरात विविध प्रकारच्या समाज उपयोगी उपक्रम राबवून रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिरे, विविध प्रकारचे नैसर्गिक आपत्ती मधील मदत मग ती बिहार मधील पुरामध्ये अडकलेल्या लोकांना मदत असो की सुनामी मध्ये उध्वस्त झालेली गावे असो की, मेळघाट सारख्या ठिकाणी आदिवासींच्या चोवीस गावांना दत्तक घेऊन तिथला मृत्युदर जवळ शून्यावरती आणणं असो, वारकरी संप्रदायातील विविध प्रकारच्या तुकाराम महाराज पालखी एकनाथ महाराज पालखी संत गजानन महाराज पालखी यामध्ये वारकऱ्यांचे सेवा करणे असो की भारतभरात होणाऱ्या कुंभमेळांमध्ये दिलेली सेवा असो, की हजारो विकलांग दिव्यांगांना स्वयं सिद्ध करणे असो अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून 95 लाख लोकांपर्यंत थेट सेवा पुरविण्यात यशस्वी झाली आहे.


आज नाशिक शहरात पुढे होऊ घातलेला कुंभमेळा आणि त्याच प्रमाणे रेड स्वस्तिक शाखा नाशिक जिल्हा इथल्या कार्यकारिणीचा कार्यकाळ पूर्ण झाल्या निमित्त नवीन कार्यकारणी ची निवड तसेच विविध प्रकारचे पुढील उपक्रम जसे की मोठ्या प्रमाणात कॅन्सर वरती काम करणे असो की दिव्यांगांना स्वयं सिद्ध करणे असो ज्या ठिकाणी आरोग्य सेवा पोहोचत नाही त्या ठिकाणी रेड स्वस्तिक पोहोचण्याचे ध्येय ठेवून त्या संदर्भातल्या कार्याचे नियोजन करण्यासाठी बैठकीची आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय कार्यकारणीचे पदाधिकारी सुनील पवार, Jt.MD अशोकराव शिंदे, जे. बी.पाटील, ज्ञानदीप पाटील उपस्थित होते.
या बैठकीचे आयोजन मा. पोलीस महासंचालक आणि रेड स्वस्तिकचे संस्थापक तथा महाव्यवस्थापक डॉ.टी एस भाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. तसेच ही बैठक जे बी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येऊन विविध प्रकारच्या प्रकल्पांची उभारणी तसेच उपक्रम यांचे नियोजन करण्यात आले असून उपक्रम कार्यान्वित करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे येणाऱ्या कुंभमेळ्याचे नियोजन यावरही चर्चा करण्यात आली तसेच रेड स्वस्तिक सोसायटीचा 25 वा वर्धापन दिवस येत असून त्याच्या यजमानपदाचा मान केंद्रीय कार्यकारिणीने रेड स्वस्तिक शाखा नाशिक जिल्हा यांना दिला असून आणि त्याच्या आयोजनाची जबाबदारी रेड स्वस्तिकच्या नाशिक जिल्हा शाखेने उचलण्यासाठी तयारी करण्याच्या संदर्भाने चर्चा करण्यात आली.
या बैठकीला केंद्रीय कार्यकारणीचे Jt.MD अशोकराव शिंदे यांनी मार्गदर्शन करताना ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पसरत जाणारा ब्रेस्ट कॅन्सर आणि इतर कॅन्सरच्या प्रमाणावरती चिंता व्यक्त करत रेड स्वस्तिक च्या वतीने राबविण्यात येणारे “कॅन्सर मुक्त भारत” अभियान मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यात राबविण्यासंदर्भात मार्गदर्शन केले, तसेच दिव्यांगाना स्वयं सिद्ध करण्यासाठी जयपूर फूट कॅलिपर तसेच संपूर्ण इलेक्ट्रॉनिक हात देण्याचे संदर्भातला उपक्रम लवकरात लवकर राबविण्यात संदर्भात व कुंभमेळ्यात सेवा देण्यासंदर्भातले नियोजन बाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी सुनील पवार यांनी 25 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्या संदर्भात मार्गदर्शन केले.
या बैठकीला नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी व कोअर कमिटी सदस्य उपस्थित होते यामध्ये उद्योगपती चेतनभाई पटेल, मा. आरटीओ अधिकारी मिलिन खानोरे, मा. डी.वाय.एस.पी.श्री प्रभाकर रायते, डॉ.योगेश पगार,.सतीश घोलप, सतीश रौंदळ, सुरेश दलाल,अरुण गायकवाड, योगेश मोरे, अर्जुन बोरसे उपस्थित होते.

Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





