best news portal development company in india

सिन्नरचे शिंदे, शिंदेंच्या हस्ते शिंदे गटाला सोडून मुंबई येथे प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश…….

SHARE:

संपादक :अरुण गायकवाड ,उपसंपादक: ज्ञानेश्वर सांगळे ,”Aone News Maharashtra”

जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क:9422952513 / 9637100608

प्रतिनिधी नाशिक

    नाशिक: सिन्नरचे शिंदे, शिंदेंच्या हस्ते शिंदे गटाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेस  ( शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश ,,,शिवसेना माजी तालुकाध्यक्ष ,स्वराज्य उमेदवारी केलेले शरद शिंदेपाटील यांचा प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदेश कार्यालयात शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश.आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार व पक्ष उभारणी करण्यासाठी प्रयत्न करावे.स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत सिन्नरमधुन जास्तीत जास्त यश संपादित करा असे आदेश दिले.प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांनी नासिक जिल्हा अध्यक्ष यांना फोनवर यासंबंधी चर्चा करत जबाबदारी देण्यासाठी सुचना केल्या.

     शरद शिंदेपाटील एकसंघ शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत शिवसेना अडचणीत असताना सिन्नर तालुक्यात शिवसेना प्रत्येक गावात स्थापन करत झंझावात निर्माण केला होता.परिणामी सिन्नरचे आमदार म्हणून राजाभाऊ वाजे विजयी होत कोकाटेंचा पराभव झाला होता.शिवसेना पक्षात फुट पडल्या नंतर कठिण काळात एकनाथ शिंदे साहेब यांना साथ देत तालुकाध्यक्ष धुरा सांभाळत शिंदे गट शिवसेना उभी केली.आज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा विचार स्विकारत शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी पक्षात प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांच्या हस्ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. विशेष म्हणजे कालच ३ तारखेला राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवारी केलेल्या उदयजी सांगळे व राष्ट्रवादी सिन्नर तालुकाध्यक्ष संजयजी सोनवणे यांनी कमळ हाती घेत भाजपात प्रवेश केला.आजही राष्ट्रवादी पक्षाला गरज असताना शरद शिंदेपाटील यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. यावेळी शिवाजी गुंजाळ,सयाजी पवार, चिंधु गुंजाळ सह कार्यकर्ते यांनीही राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई