प्रतिनिधी नाशिक:::

जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क साधा. 9422952513/9637100608
मंत्रालय, मुंबई | 4 नोव्हेंबर 2025
नाशिक:राज्यातील द्राक्ष बागायतदारांना भेडसावत असलेल्या विविध अडचणींवर तोडगा काढण्यासाठी आज दालन क्र. ३०१, ३रा मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत द्राक्ष बागायतदार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत द्राक्ष उत्पादन, निर्यात, दर, विमा आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या अडचणींवर सखोल चर्चा करण्यात आली.

या बैठकीत द्राक्ष पिकांचे अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी विमा निकषात सुधारणा करण्याच्या सूचना कृषी मंत्री यांनी विभागास दिल्या आहेत.
तसेच कृषी विभागाने या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक दृष्टीकोन ठेवला असून द्राक्ष उत्पादकांच्या अडचणींना प्राधान्याने हाताळले जाईल. तसेच त्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत समन्वय साधून ठोस निर्णय घेतले जाणार आहेत.
या बैठकीस आमदार रोहित पाटील, आमदार अभिजित पाटील, उपसचिव संतोष कराड, संचालक रफिक नाईकवडी, संचालक वैभव तांबे, अवर सचिव राजेश पाध्ये व विमा कंपन्यांचे प्रतिनिधी आणि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......




