प्रतिनिधी: भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर

सिन्नर दि. 31 ऑक्टोबर 2025 —

सिन्नर: आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पंचवार्षिक निवडणूक च्या पार्श्वभूमीवर सिन्नरमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून ठाकरे गटाची व खासदार वाजे भाऊ वाजे समर्थक भारत कोकाटे यांनी नुकताच ठाकरे गटातून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश केला असतानाच महाविकास आघाडीला पुन्हा दुसरा धक्का बसला असून शरद पवार गटाचे नेते उदय सांगळे यांनी ही शरद पवार गटाची देऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित झाले आहे व या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम तीन नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे.
उदय सांगळे हे गेल्या विधानसभा निवडणुकीत मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आमदारकीला उभे होते परंतु पक्षांतर्गत धोका बसल्याने उदय सांगळे यांना थोड्याफार मताने पराभव व्हावा लागले होते. तेव्हापासून उदय सांगळे हे दिद्वा मनस्थितीत असल्याचे दिसत होते व योग्य वेळ आणि काळ आल्यावर निर्णय घेण्याची मनातील इच्छा त्यांनी भाजपमध्ये प्रवेशाच्या बाबतीत दाखवून दिली आहे. केवळ कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठीच सत्ताधारी पक्षात सामील होत आहे. अशा स्पष्ट शब्दात सांगळे यांनी सांगितले आहे.
नगरपरिषद व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत तोंडावर सांगळे यांनी भाजपमध्ये करण्याचे निश्चित झाल्यानें राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आमदारकीला उभे राहिलेले सांगळे यांनी चांगली झुंज देत जवळपास एक लाख मतांपर्यंत मजल मारली होती. या निसटत्या पराभवाची सल मनात होतीच पण राजकीय समीकरणे जुळवून घेणे आवश्यक असते त्यामुळे सांगळे यांनी आहे त्या स्थितीत तालुक्यातील जनतेशी संवाद साधत संपार्कात राहुन कार्यकर्त्यांच्या अडिअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशिल राहीले.
भाजपाने एका वेळी दोन नेते गळाला लावुन महाविकास आघाडीसह अजित पवार गटाचे नेते मंत्री माणिकराव कोकाटे यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.. असं मत सुज्ञ नागरिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर व्यक्त करीत आहेत. या सर्व घटना तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्यास कारणीभूत ठरणार का ? या कडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे चर्चा सुरू झाली आहे.




श्री.सांगळे यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सोमवार दिनांक 3 नोहेंबरला आडवा फाटा येथील वंजारी समाज मैदानावर होणार असून या समारंभाला भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण. मंत्री गिरीश महाजन. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. मंत्री पंकजा मुंडे हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......




