प्रतिनिधी नाशिक: हिंदू धर्म रक्षक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्म सोहळा समिती आयोजित अहिल्या जन्मोत्सव पंचवटी त्रिशताब्दी वर्ष भव्यतव्य स्वरूपात साजरा होण्यासाठी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या काशीविश्वेश्वर मंदिरावरती ही नियोजन बैठक पार पडली.
भारत सरकारने संपूर्ण भारतभर ही वर्ष पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त त्रिशताब्दी वर्ष म्हणून साजरी करण्याचे ध्येय हाती घेतले आहे. मातोश्रींचा इतिहास संपूर्ण भारतभर गावोगावी खेडूपाडी जागृत हवा यासाठी केंद्र सरकार आपलं परीने प्रयत्न करत आहे. सालाबादप्रमाणे अहिल्या जन्मोत्सव पंचवटी हा सोहळा गेली अनेक वर्षापासून सुरू आहे. हा सोहळा रामकुंड पंचवटी या ठिकाणी 31 मे रोजी सायंकाळी सात वाजता सुरुवात होतो.या ठिकाणी भव्य पुरुष नाही तसेच फटाक्यांची अतिश बाजी होणार आहे.असे समाधान बागल यांनी सांगितले.

या वेळी रामदास काळे यांचे व्याख्यान त्या पार्श्वभूमीवर रामकुंडावर शुक्रवारी आयोजित करण्यात आले आहे. विशेष कार्यक्रमासह गंगा गोदा आरतीसह अहिल्यादेवी यांच्या आरतीचे ही सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समितीने आयोजन करण्यात आले आहे.
याही वर्षी समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर त्रीशताब्दी वर्षानिमित्त 300 मूर्ती वाटप करण्याचे ध्येय श्री समाधान बागल यांनी केले. आणि एकाच वेळी तीनशे ठिकाणी हा जन्मोत्सव साजरा होणार आहे. समितीच्या वतीने वर्षभर अखंड महाराष्ट्रभर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त छोटी मोठी सोहळे साजरी केली. होळकर शाही चा इतिहास जागृत करण्यासाठी समितीने अनेक उपक्रम राबविले. आणि शेवटी 31 मे चा हा त्रिशाताब्दी सोहळा भव्य दिव्य स्वरूपात साजरा होण्यासाठी भारतातील सर्वात मोठी जन्मोत्सव सोहळा हा नासिकच्या रामकुंडा वरून दिसणार आहे. यानिमित्त नियोजन बैठक पार पाडण्यात आली.
या सोहळ्याच्या अध्यक्षपदी निवृत्ती धात्रक सर यांची निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी हेमंत शिंदे साहेब देवराम भाऊ रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली. नियोजन समिती प्रमुख ऋषिकेश डापसे,ज्ञानेश्वर ढेपले,कार्याध्यक्षपदी अण्णासाहेब सपनार तसेच राजेभाऊ बादड,स्वागत अध्यक्ष पदी शोभाताई काळे, अमोल गजभार सर,प्रशांत बागल सर, भूषण जाधव,ललित पवार यांची नियुक्ती करण्यात आली.
नियोजन समिती सदस्य पदी श्याम गोसावी,पंढरीनाथ कोरडे,रामेश्वर खनपटे ,मुंजाभाऊ ढोले, कल्पेश शिंदे,अनिल भावसार दत्तु जाधव, दिपक भोई ,लक्ष्मण पवार, सुभाष निकाळजे, नितिन गव्हाणे पाटील
मार्गदर्शन समिती पदी दिगंबर भाऊ मोगरे,मुकुंद राजे होळकर पुरोहित महासंघाचे शुक्ला काका,मच्छिंद्र भाऊ बिडगर, गणेश भाऊ निंबाळकर, दत्तू भाऊ बोडके,अनिलभडांगे,संगीता ताई पाटील,विनायक जी बबलू मिर्झा, काळदाते,नवनाथजी ढगे,तुषार चिंचोले,शशिकांत कोथिंबिरे,भास्कर जाधव या वेळी राजाभाऊ पोथारे,नवनाथ शिंदे सुभाष शिरोळे सर,खंडेराव पाटील, शिवाजी ढगे,शशिकांत वाघ, देविदास भडांगे,तसेच कार्यकर्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात साजरा करण्यात येणार आहे….
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......







