best news portal development company in india

नांदूर शिंगोटे ते कोल्हार रस्त्याच्या सुधारणा कार्याचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी यांच्या हस्ते संपन्न.

SHARE:

नांदूर शिंगोटे ते कोल्हार रस्त्याच्या सुधारणा कार्याचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी यांच्या हस्ते संपन्न.

प्रतिनिधी:-भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर

सिन्नर:नांदूर शिंगोटे ते कोल्हार या महत्त्वाच्या मार्गाच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते आज उत्साहात पार पडले.यावेळी राज्याचे मंत्री व अहिल्यानगरचे पालकमंत्री डॉ. श्री राधाकृष्ण विखे पाटील जी, माजी मंत्री श्री अण्णासाहेब म्हस्के जी, खासदार श्री भाऊसाहेब वाकचौरे जी, मा खासदार सुजय विखे जी तसेच आमदार अमोल खताळ जी, जिल्हाधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा रस्ता परिसराच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, त्याच्या सुधारामुळे स्थानिक उद्योग, शेती आणि पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे.यासोबतच औद्योगिक विकासाला चालना मिळेल तसेच रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. अवजड वाहतूक कोंडी दूर होईल. प्रवासाच्या वेळेची आणि इंधनाची बचत होईल. तसेच वाहतूक सुरक्षेमध्ये सुधारणा होऊन अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल.

 

आगामी नाशिक महाकुंभ दरम्यान नाशिक – नांदूर शिंगोटे – कसारे रस्त्यावरील वाढणारी वाहतूक लक्षात घेता नांदूर शिंगोटे ते कसारे रस्ताही ४-लेन करण्यात येणार असल्याची आज घोषणा केली. २०२५ मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात १३८० कोटी रुपयांची ४ नवीन रस्ते प्रकल्पांची कामे मंजूर करण्यात आली असून ६५८ कोटी रुपयांसह नगर ते सबळखेड व पुढे आष्टी चिंचपूर रस्त्याचे पेव्ह्ड शोल्डरसहित २-लेन कार्य, ३८६ कोटी रुपयांसह बेल्हे – अलकुरी – निघोज – शिरुर रस्त्याचे सुधारकार्य आणि ११ कोटी रुपयांसह श्रीगोंदा गावातील लहान पुलाच्या बांधकाम कार्याचेही आज भूमिपूजन करण्यात आले आहे.

 

या वेळी बोलताना मा.गडकरी जी यांनी देशातील रस्ते विकासाचे महत्त्व अधोरेखित केले व हा प्रकल्प वेळेत आणि गुणवत्तेने पूर्ण

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई