best news portal development company in india

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव तालुका निफाड येथे असणाऱ्या अनाथ आश्रम वृद्धाश्रम तसेच गोशाळा या ठिकाणी एक आगळावेगळा विवाह संपन्न,जय जनार्दन अनाथ आश्रम वृद्धाश्रम तसेच गोशाळा चे सचिव गुंजाळ सर यांनी या कार्यक्रमाचे सर्व नियोजन केले होते या कार्यक्रमाला वासुदेव नंदगिरी जी महाराज यांचे आशीर्वाद लाभले या कार्यक्रमासाठी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील खासदार श्री भास्कर भगरे सर उपस्थित……

SHARE:

प्रतिनिधी:-विकास उगलमुगले,लासलगाव

लासलगाव:-नाशिक जिल्ह्यातील लासलगाव तालुका निफाड येथे एक प्रसिध्द असे जय जनार्दन अनाथ आश्रम वृद्धाश्रम तसेच गोशाळा आहे, या जय जनार्दन अनाथ आश्रम,वृद्धाश्रम व गोशाळा ठिकाणी एक आगळावेगळा विवाह संपन्न झाला या विवाहासाठी परिसरातील अनेक नागरिकांनी गर्दी केली होती.

जय जनार्दन अनाथ आश्रम वृद्धाश्रम तसेच गोशाळा येथील या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्यातील दांपत्य हे याच जय जनार्दन अनाथ आश्रम वृद्धाश्रम गोशाळा येथेच लहानाचे मोठे झालेले आहे त्यांना मायेचा आधार या आश्रमातूनच मिळालेला आहे तसेच या आश्रमातील बहुसंख्य मुला मुली यांचे विवाह झालेली आहे. या विवाह सोहळ्यातील कावेरी ही कन्या 106 वी अनाथ असून तसेच स्वप्निल हा 69 वा चिरंजीव आहे यांचा विवाह मोठ्या थाटात संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी वासुदेवनंदाजी गिरी महाराज यांचे आशीर्वाद लाभले ,या जय जनार्दन अनाथ आश्रम वृद्धाश्रम तसेच गोशाळा चे अध्यक्ष गुंजाळ सर यांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घेऊन नियोजन केले होते, या कार्यक्रमासाठी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील खासदार श्री भास्कर भगरे सर यांनीही उपस्थिती दर्शवली खासदार भगरे सर यांनी येथील गुंजाळ सर व ट्रस्टी यांचे विशेष आभार मानले व नवविवाहितांना शुभाशीर्वाद दिले पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. परिसरातील अनेक नागरिक ही आशीर्वाद व शुभेच्छा देण्यासाठी या विवाह सोहळ्याला उपस्थित होते.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई