best news portal development company in india

लाच घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची प्रतिकात्मक अंत्ययाञा..निफाड भुमी अभिलेख कार्यालय भ्रष्टाचाराचे ठरले महाकुंड….

SHARE:

aonenewsmaharashtra@gmail.com
प्रतिनिधी:-ज्ञानेश्वर सांगळे,नाशिक

 नाशिकःभारत स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी आपल्या रक्ताची पर्वा न करता…पुढील भारतदेशातील पीढी ताठ मानेने जगेल…स्वाभिमान आणि देशाप्रती असणारा देशअभिमान जपेल..स्वातंत्र्य समता आणि बंधुता चे पालन करेन अशा भाबडया अपेक्षांमध्ये अनेकांचे रक्त सांडले.परंतु स्वातंत्र्याचा लाभ घेवुन..आपल्या व्यवस्थेवर घाण कराणा-यांची कमी नाही . असाच प्रसंग आज बघायला मिळाला.निफाड येथील भुमी अभिलेख कार्यालयातील शिपयाने तब्बल साडेतीन लाखाची लाच घेतांना पकडला गेला…सरकारी नोकरी ही सरकार व्यवस्था मजबुत करण्यासाठी असते..कायाद्याचे पालन करुन ..शासनाला प्रबल करण्याचे साधन असते…ह्यामध्ये कायद्याचा गैरवापर करुन आपल्या वैयक्तिक संपत्तीसाठी…देशाशी.आणि सामाजिक ,राजकीय ,व्याव्हारीकतसेच सामाजिक व्यवस्थेशी प्रतारणा करणे म्हणजे देशद्रोह होय…स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्या व्यक्तींना छञपती संभाजी राजांनी हत्तीच्या पायाशी दिले…परंतु लोकशाही व्यवस्था हाताळताँना ह्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी…शासकीय सेवेत असणारा प्रत्येक व्यक्ती हा लोकसेवक असतो…त्याने पैसे मागणे म्हणजे त्याचे वर्तन देशद्रोहाचा गुन्हा करणे आसे आहे …शासणाला विनंती आहे ..ह्या दोशद्रोही व्यक्तीविरोधात आणि त्याससामिल असणाऱ्या सर्व घटकांस…शासनाने कठोर शिक्षा द्यावी ..ही मागणी मा.पञकार ज्ञानेश्वर सांगळे ह्यांनी आपले मत व्यक्त करतांना केली.

    आज निफाड ह्या ठिकाणी भुमी अभिलेख कार्यालय येथील शिपाई गाडे ह्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली .साडेतीन लाखरुपये घेतांना सदर इसम पकडला गेला..ह्या निषेधार्त निर्भय महाराष्ट्र पार्टीचे सर्वेसर्वा..संस्थापक अध्यक्ष मा.जितेंद्रभावे ह्यांनी त्या कर्मचाऱ्याची अंत्ययाञा काढत निषेध व्यक्त केला .भ्रष्टाचार ही संविधानास आणि व्यवस्थेस लागलेली किड आहे .लाचखोरांना शिक्षा काय…??दोनचार महिने निलंबित होतात..आणि पुन्हा कुठेतरी ठिकाण बदलुन रुजु होतात…शासकीय सेवेतील लोकांनी नितिमत्ता चारित्र्य जपले पाहिजे …संपुर्ण व्यवस्थेला दोषदेऊ शकत नाही माञ…सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार थाबला पाहिजे …जनतेची काम भ्रष्टाचार रहीत पार पडली पाहिजे असे मतमांडत सदर घटनेचा निषेध व्यक्त केला .

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई