
नाशिक :-
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून मंडळ अधिकारी चांदवड यांना लाच घेताना रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला…..
तक्रारदार– पुरूष वय 39 वर्षे यांच्याकडे ओलेसे.प्रविण गणपत प्रसाद वय 57 वर्षे, व्यवसाय-नोकरी मंडल अधिकारी, वर्ग-3 सदर यांनी 2000 ची लाच मागणी केली होती.
सविस्तर वृत्त — लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक युनिट यांनी सापळा रचून यशस्वी केला.दिनांक 13/02/2025 रोजी तक्रार- यातील तक्रारदार पुरुष वय 39 यांनी काळखोडे गाव तालुका चांदवड येथे जमीन खरेदी केली होती. त्यांची 7/12 मध्ये नोंद करण्याकरता तक्रारदार यानी तलाठी वाकी खुर्द याच्या कडे अर्ज सादर केला होता. तो आलोसे यांच्याकडे मंजुरी साठी आला होता. प्रकरणाची चौकशी अनुषंगाने तक्रारदार यांनी दिनांक 12/2/1025 रोजी याबाबत आलोसे यांच्याकडे विचारणा करण्यास गेले असता तेथील मंडळ अधिकारी प्रविण गणपत प्रसाद यांनी तक्रारदार यांच्याकडे सदर नोद मंजुर करून देण्याचा मोबदल्यात 2000 रुपयाची लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी त्याबाबत आज दिनांक 13/02/2025. रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता मंडळ अधिकारी प्रवीण प्रसाद यांनी मागणी करून ती आज रोजी 2000/- रुपये लाच पंचासमक्ष स्विकारली म्हणून आलोसे यांचे विरुध्द चांदवड पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण, येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
आलोसे यांचे सक्षम अधिकारी- मा.जिल्हाधिकारी जिल्हा , नाशिक ,
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
सापळा अधिकारी दाखल अधिकारी तपास अधिकारी
श्री.अमोल सदाशिव वालझाडे,पोलीस निरीक्षक,ला. प्र. वि. नाशिक.
सापळा पथक :- पोहवा /संदीप हांडगे,पोना/ सुरेश चव्हाण चापोहवा / विनोद पवार.
मार्गदर्शक –मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे- वालावलकर
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि,नाशिक परीक्षेत्र, नाशिक.
याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणत्याही खाजगी इसम याने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दुरध्वनी क्रमांक–02562234020
टोल फ्री क्रमांक -1064
दुरध्वनी क्रमांक. 02532578230
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





