निफाड
निफाड दि.12 फेब्रुवारी रोजी निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर येथील होळकर वाड्यामध्ये राज्यातील वरीष्ठ मान्यवरांच्या हस्ते श्रीराम मंदिर भूमीपूजन पार पडले मात्र ह्या भुमीपुजनामुळे अहिल्याप्रेमी आक्रमक झाले असून होळकर वाड्यासाठी मोठा लढा उभारण्यात येईल अशी भूमिका जिल्ह्यातील अहिल्याप्रेमी यांनी घेतली आहे.
ज्या दिवशी भुमीपुजन झाल अगदी त्याच दिवशी होळकर वाड्यात अज्ञात व्यक्तींनी येऊन तोडफोड केल्याबाबत वृत माध्यमातून प्रसारित झाले होते, ह्याच वाड्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांच्या हस्ते भुमीपुजन पार पडले.
पण ह्या कार्यक्रमानंतर अहिल्याप्रेमी आक्रमक झाले असुन अखंड भारताला हिंदु मंदिरे बांधुन भारताला खऱ्या अर्थाने हिंदुस्थान करणाऱ्या हिंदु धर्मरक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नांदुरमध्यमेश्वर येथील खाजगी होळकर वाड्यात विना परवानगी वाडा पाडून श्रीराम मंदिर बांधायचा घाट का घातला जातोय असा प्रश्न उपस्थित केला जातोय,शिवाय ह्या मंदिर बांधकामासाठी शासकीय निधी वापरला जात आहे मग वाड्याच संवर्धन करुन आतमध्ये राममंदिर व त्यासमोर अयोध्या व काशी विश्वनाथ प्रमाने अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी केली जाते आहे. 
ह्या प्रकारानंतर जिल्ह्यातील धनगर समाज आक्रमक असुन लवकरच मोठ्या संख्येने भुजबळ यांना भेटुन चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे, होळकर वाडा हा अहिल्यादेवी होळकर यांचा असल्याने इतिहासात त्याच वेगळ महत्त्व आहे, मग ऐतिहासिक वास्तू संवर्धन सोडून होळकर वाडा पाडण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला जानार नाही असा इशारा हिंदु धर्म रक्षक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समितीचे अध्यक्ष समाधान बागल यांनी दिला असुन यासाठी भुतो न भविष्यती असा संघर्ष करण्याची तयारी समीती, इतिहास प्रेमी, अहिल्याप्रेमी व जिल्ह्यातील धनगर समाज यांनी कैली आहे ,तसेच राज्यभरात यासाठी मोठा लढा उभा करुन होळकर वाड्याची तोडफोड करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले आहे.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......






