श्री संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मध्ये भाविकांची गर्दी वाढत असुन राज्याच्या कानाकोपर्यातुन वारकर्यांच्या दिंङ्या दाखल होत आहे.ठिकठिकाणी दिंड्यांचे स्वागत करण्यात येत आहे.टाळमृदुंगाच्या गजराने व हरिनामाच्या जयघोषाने त्रंबकनगरी दुमदुमून जात आहे.
प्रतिनिधी:-रविंद्र धारणे,त्र्यंबकेश्वर
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पौष वद्य एकादशी अर्थात शनिवार दि. २५ रोजी संपन्न होत असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या यात्रेनिमित्त श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मध्ये भाविकांची गर्दी वाढत असुन राज्याच्या कानाकोपर्यातुन वारकर्यांच्या दिंङ्या दाखल होत आहे. यात्रेच्या पार्श्वभुमिवर ठिकठिकाणांहून निघालेल्या दिंड्या त्र्यंबक नगरीत दाखल होत आहे.नाशिक-त्र्यंबक, जव्हार-त्र्यंबक तसेच घोटी-त्र्यंबक असे तिनही मार्ग भगवेमय झाले असुन टाळमृदुंगाच्या गजराने व हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून जात आहे. शुक्रवार दि. २४ रोजी सायंकाळ पर्यंत सर्व पायी दिंड्या नगरीत दाखल होतील. ठिकठिकाणी दिंड्यांचे स्वागत करण्यात येत आहे. त्र्यंबकेश्वरच्या प्रवेशद्वारावर श्री.गजानन महाराज संस्थान आणि नगर परिषदेच्या वतीने दिंडीप्रमुखाला नारळ गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येत आहे. भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेत कुशावर्त तिर्थाला वंदन करून दिंड्या निवृत्तीनाथ मंदिराकडे प्रस्थान करीत आहे. निवृत्तीनाथ मंदिर संस्थानच्या वतीने परंपरेनुसार प्रत्येक दिंडीच स्वागत करण्यात येत आहे. नाथांचे दर्शन घेऊन दिंड्या आपापल्या मुक्कामाच्या जागेवर जात आहेत.

व्यावसायिकांनी आपापली दुकाने थाटले असुन काही दुकाने लावण्याच्या तयारीत आहेत. रहाट पाळणे, चक्री, मौतका कुवाॅ आदी मनोरंजनाची साधणे उभारण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज मंदीराला विद्युत रोषणाई करण्यात आली असुन दगडी समारंभाचे काम सुरु असल्याने यात्रेकरीता मंदीरा समोर आकर्षक मंडप टाकण्यात आला आहे. दर्शनबारीचेही काम पुर्ण झाले आहे.

निवृत्तीनाथ महाराज महापुजा
श्री संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त शुक्रवारी रात्री ११ ते शनिवारी पहाटे १ वाजेपर्यंत संस्थानच्या वतीने महापुजा संपन्न होईल. त्यानंतर पहाटे ४ वाजता श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधीची शासकीय महापूजा ना. गिरीश महाजन यांचे हस्ते संपन्न होणार आहे असे भाजपच्या सुत्रांनी सांगितले आहे.
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनखाली प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. उपविभागीय अधिकारी ओमकार पवार, तहसीलदार श्वेता संचेती, प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. श्रीया देवचके हे सर्व परिस्थिती वर लक्ष ठेवून आहे.
त्र्यंबकेश्वर मध्ये सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त पोलिस,प्रशासन सज्ज
पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधिक्षक आदित्य मिरखेलकर, उप अधीक्षक वासुदेव देसले, पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. शहरामध्ये राखीव दलाचे पोलिसही दाखल झाले असून ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी निवृत्तीनाथ संस्थान तर्फे अध्यक्षा ह.भ.प. कांचन ताई जगताप,निलेश गाढवे. अॅ.ड. सोमनाथ घोटेकर, प्रसिद्धी प्रमुख तथा विश्वस्त अमर ठोंबरे, पालखी प्रमुख नारायण मुठाळ, विश्वस्त माधवदास महाराज राठी, श्रीपाद महाराज कुलकर्णी, राहुल महाराज साळुंखे, नवनाथ महाराज गांगुर्डे, ह.भ.प. जयंत महाराज गोसावी, ह.भ.प. योगेश महाराज गोसावी आदी परिश्रम घेत आहे.
भागवत पंथामध्ये ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला अनन्य साधारण महत्व आहे.त्यामुळे मुक्कामावर थांबलेल्या दिंड्यांमधील शेकडो भाविक टाळमृदुंगाच्या गजरात अभंग गात ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला मार्गस्थ होत आहे.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......








