रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन मनोज मोदी यांनी त्र्यंबक राजाच्या सुवर्ण मुकुटासाठी केले सव्वा किलो सुवर्णदान……..
aonenewsmaharashtra@gmail.com
प्रतिनिधी:-रवींद्र धारणे,त्रंबकेश्वर
मागील महिन्यात मनोज मोदी हे त्रंबकेश्वर येथे दर्शनासाठी आले होते. तब्बल २०० वर्षांपूर्वीचा सुवर्ण मुकुट नवीन बनवण्याचा संकल्प त्यांना सांगण्यात आला होता.
देशभरातील भाविकांच्या सुवर्णदानातुन साडेआठ किलो वजनाचा सुवर्ण मुकुट बनवण्याचा संकल्प वर्षभरापूर्वी करण्यात आला होता. सदर सुवर्णदानास पाच किलो पेक्षा जास्त सोने देवस्थान कडे जमा झालेले आहे. मनोज मोदी यांनी उरलेले सोने मी स्वतः देतो असे कबूल केले होते परंतु अजूनही काही भाविक महाशिवरात्रीपर्यंत सोने दान करण्यासाठी इच्छुक असल्याने त्यांना सव्वा किलो दान करू शकतात असे सांगण्यात आले होते.
त्या अनुषंगाने आज त्यांचे सहकारी हितेश भाई सपत्नीक येऊन त्यांनी रीतसर संकल्प करून सदर सव्वा किलो सोने देवस्थानकडे सुपूर्द केले.
त्याप्रसंगी त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कैलास घुले, रूपाली भुतडा, पुरुषोत्तम कडलग, मनोज थेटे, डाॅ. सत्यप्रिय शुक्ल, स्वप्निल शेलार व प्रदीप तुंगार आदी उपस्थित होते. सदर सुवर्णदानास सहकार्य लाभलेले मनोज मोदी यांचे निकटवर्तीय मनोज तुंगार हे उपस्थित होते.
सदर सुवर्णदानाची पावती त्यांचा सत्कार करुन सुपूर्द करण्यात आली त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये हे सर्वात मोठे दान असल्याचे सांगण्यात आले.

Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......






