best news portal development company in india

ग्रामसेवक विरोधात लाच मागणी प्रकरणी,घोटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल….

SHARE:

प्रतिनिधी नाशिक 

  ग्रामसेवक श्रीमती सुवर्णा छगन आहेर यांनी लाच मागणी केली  ला.प्र.वि.नाशिक यांनी रंगेहात पकडले घोटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल…

युनिट-नाशिक

 तक्रारदार.पुरूष वय 40 वर्षे  
सविस्तर-तक्रार- यातील तक्रारदार हे शेती व जमीन खरेदी विक्री खाजगी एजंट म्हणून व्यवसाय करतात. तक्रारदार व त्यांचे मित्र मिळून त्यांनी आदिवासी जमीन ही बिगर आदिवासी व्यक्ती चा नावे खरेदी करण्यासाठी मा.जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे अर्ज सादर केला असता सदर प्रकरणाची चौकशी अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालय भरवज ता.इगतपुरी यांच्याकडे आदिवासी व्यक्ती ते बिगर आदिवासी प्रकरणामध्ये ग्रामपंचायत कडील ठराव घेण्यात यावा याबाबत मा.तहसीलदार इगतपुरी यांनी आदेशीत केले असता तक्रारदार हे सदर ठराव बाबत ग्रामपंचायत भरवज ता.इगतपुरी यांच्याकडे विचारणा करण्यास गेले असता तेथील ग्रामसेवक श्री. सुवर्णा आहेर मॅडम यांनी तक्रारदार यांच्याकडे सदर ठराव देण्याचा मोबदल्यात 30 हजार रुपयाचे पंचासमक्ष मागणी करून ती आज रोजी 30,000/- रुपये लाच पंचासमक्ष स्विकारली म्हणून आलोसे यांचे विरुध्द घोटी पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण, येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आलोसे. श्रीमती सुवर्णा छगन आहेर वय 39 वर्षे, व्यवसाय-नोकरी ,ग्रामसेवक, वर्ग-3 मागणी केलेली लाचेची रक्कम.50,000/-₹तडजोडीअंती लाच मागणी रक्कम 30,000/-₹रुपये स्वीकारली रक्कम -20,000/-रुपये  हस्तगत रक्कम – 20,000/- रुपये पडताळणी दिनांक-दिनांक 03/12/2024 रोजी यशस्वी सापळा :- दिनांक 7/01/2025 रोजी     
आलोसे यांचे सक्षम अधिकारी- मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक 
सापळा अधिकारी व दाखल अधिकारी व तपास अधिकारी 
श्री.अमोल सदाशिव वालझाडे,पोलीस निरीक्षक ला. प्र. वि. नाशिक. यांच्या मार्गदर्शना खाली सापळा रचण्यात आला या सापळ्यामध्ये सापळा पथक-पोहवा /संदीप हांडगे,पोना/ सुरेश चव्हाण मपोना/ राजश्री अहिरराव चापोहवा / संतोष गांगुर्डे 

 मार्गदर्शक –मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे- वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि,नाशिक परीक्षेत्र, नाशिक
मो.न. 9371957391
’याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक येथे संपर्क करावा.
दुरध्वनी क्रमांक. 02532578230
’टोल फ्री क्रमांक १०६४
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई