
प्रतिनिधी:- रवींद्र धारणे,त्र्यंबकेश्वर
सुप्रसिध्द युवा चित्रकार डाॅ. इंजि. सिध्दार्थ धारणे यांनी काढलेल्या एकदिवसीय चित्र प्रदर्शनाला चित्र रसिकांनी मोठी गर्दी….
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच उत्तमोत्तम पेंटींग्ज बघायला मिळाल्याने नागरीकांनी आनंद व्यक्त करत सिध्दार्थला शुभेच्छा दिल्या.
अत्यंत मनमोहक, हृदयस्पर्शी चित्र काढणारे डाॅ. सिध्दार्थ धारणे यांची ख्याती सर्वदुर पोहोचली आहे. सोशल मिडीयावर त्यांचे असंख्य फाॅलोअर्स आहेत. त्यामुळे त्यांनी काढलेल्या पेंटींग्जची रसिकांना कायम उत्सुकता असते. त्यामुळेच लोकाग्रहास्तव चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्र्यंबक घोटी रस्त्यावरील सिध्दार्थ आर्ट गॅलरीच्या प्रांगणात आणी निसर्गरम्य वातावरणात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
शिवसेनेचे शहराध्यक्ष सुरेशतात्या गंगापुत्र, नाशिकचे सुप्रसिध्द आर्किटेक धनंजय शिंदे, कर्नल अरुण झा, कैलास गिरम, युनिकाॅल कंपनीचे संचालक हेमल चुघ, शिवप्रसाद गिरम, डाॅ. सचिन काळे, नंदकुमार धारणे, ज्योती धारणे आदिंचे हस्ते दिपप्रज्वलन करुन प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. डाॅ. सिध्दार्थ यांची कलाकारी बघुन गंगापुत्र यांनी कलेचा गौरव म्हणुन सिध्दार्थ यांचा शाल, पुष्षहार, रोख पारितोषीक देऊन सत्कार केला. प्रदर्शनात पौराणिक, ऐतेहासिक, व्यक्तीचित्र, निसर्गचित्र, ग्रामीण जिवन असे विविध प्रकारच्या पेंटींग्ज नागरीकांना बघावयास मिळाल्या. गंगावतरण, छत्रपती शिवाजी महाराज याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हुबेहुब काढलेले पेंटींग आकर्षणाचे केंद्रबिंदु ठरले. एखाद्या बंदीस्त हाॅलमध्ये प्रदर्शन न घेता निसर्गरम्य, आल्हाददायक वातावरणात वनसंपदेच्या साक्षीने मोकळ्या वातावरणातील प्रदर्शन नागरीकांना अधिक भावले.
परिसरातील श्रीसंत निवृत्तीनाथ माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसह येऊन प्रदर्शनाचा आनंद घेतला. यावेळी डाॅ. सिध्दार्थ धारणे यांनी विद्यार्थ्यांना चित्रकले विषयी सखोल माहिती व डिझाईन मधील करिअरच्या संधी याबाबद मार्गदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता पालीवाल, निर्मला शिंदे मेढेपाटील, के. एस. रेवगडे, सतिश सानप, जि. प. शाळेच्या मुक्ता गायकर आदीनी डाॅ. धारणे यांचे आभार मानले.
चित्रप्रदर्शन बघण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. सर्वच रसिकांनी चित्रे आपापल्या मोबाईलमध्ये साठवुन घेतले.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





