best news portal development company in india

गोदावरी कालव्याचे पाणीचोरी,कोळगाव माळ येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश कदम यांचे आमरण उपोषण,आज तिसरा दिवस…

SHARE:

पत्रकार-भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर  

      उजव्या कालव्याचे पाणी चोरी त्वरित थांबवावी,कोळगाव माळ येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश कदम यांनी आमरण उपोषण सुरू केले आज तिसरा दिवस आहे.

       सिन्नर. दि.१७/१२/२०२४ गोदावरी उजव्या कालव्याचे पाणी चोरी त्वरित थांबवावी यासाठी कोळगाव माळ येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश कदम यांनी आमरण उपोषण सुरू केले असून आज तिसरा दिवस आहे. यासंबंधीची माहिती राहता येथील उपविभागीय अभियंता यांना पाठवली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की कोळगाव माळ हद्दीत गोदावरी कालव्या अंतरगत जवळपास दोनशे अनाधिकृत ( डोंगळे ) असून याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी व शासनाच्या पाण्याची होत असलेली चोरी थांबवावी अशी मागणी आहे, जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे श्री.कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
          श्री कदम यांनी उपोषणाचं हत्यार उपसल्याने प्रशासन खडबडून जागे झाले असून या हद्दीत येत असणारे अनाधिकृत पाणी उचलणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून जे.सी.बी. मशिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे,या संदर्भात संबंधित विभागाने कळविले आहे व मशिनद्वारे कालव्याच्या दोन्ही बाजूला असलेली पाईप लाईन काढुन टाकण्यात येईल असे आश्वासन दिले आहे, परंतु जोपर्यंत ठोस कारवाई केली जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा श्री, कदम यांनी दिला आहे.
       या संदर्भात पत्रकारांनी काही स्थानिक गावकरी व शेतकरी या संदर्भात विचारले असता,त्यांनी सांगितले की हा व्यक्तिगत वाद असुन हे उपोषण करून आपलीं पोळी भाजून घेतली जाते आहे,परंतु त्यासाठी संपूर्ण गावाला वेठीस धरू नये असेही काही शेतकऱ्यांनी सांगितले आहे. याबाबत बोलताना कदम सांगितले की माझं वैयक्तिक कोणताच वाद नसुन गावातील व शेतकरी लोकांच्या विरोधात मी नाही तर संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या आर्थिक देवाणघेवाण करून अनाधिकृत पाणी चोरी करणाऱ्याकडे कानाडोळा केला जात आहे याला माझा विरोध आहे, त्यामुळे सरकारी पाण्याची चोरी होत असते याला आळा बसावा यासाठी आपण उपोषण करून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मार्ग निवडला आहे व मला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.
          मी वैयक्तिक कोणाचेही नाव घेतले नसुन माझा वाद हा शासनाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात आहे, त्यामुळे सर्वसामान्य समाजाशी निगडीत असलेल्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे ह्या मताशी सहमत आहे ,परंतु कालव्याला पाणी आल्यानंतर संबंधित विभागाकडुन विज वितरण पाण्याची चोरी होऊ नये म्हणून मंडळाला विज बंद करण्याचे आदेश दिले जाते . परंतु यात चोरी न करणाऱ्या शेतकऱ्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पाणी असुनही पिकांना पाणी देता येते नाही याला जबाबदार कोण असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. चोरी थांबवा विज बंद करण्याची वेळच येणार नाही. यासाठी माझं आंदोलन सुरू आहे व निर्णय लागत नाही, तोपर्यंत उपोषण सोडले जाणार नाही असे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले..
        प्रतिनिधी सिन्नर:भाऊसाहेब हांडोरे 
 aonenewsmaharastra@gmail.com
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई