प्रतिनिधी भाऊसाहेब हंडोरे, सिन्नर
सिन्नर: अखेर उदय सांगळे यांनी उमेदवारी खेचून आणणार आहे. या अनुषंगाने सिन्नर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उदय सांगळे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असून तालुक्यांत विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे
आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार उदय सांगळे यांच्यात खरी लढत होणार… ! 
तसेच उदय भाऊ सांगळे यांच्या रूपाने तालुक्याला एक नवीन तरूण तडफदार चेहरा देऊन शरद पवार यांनी वेगळीच चाल करून उदय सांगळे यांना निवडणूकीत उतरवले, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते आ. श्री.माणिकराव कोकाटे यांना शह देण्यासाठीच व्युहरचना आखली आहे ,मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत उदय सांगळे यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते जयवंत पाटील आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत प्रदिर्घ चर्चेनंतर अखेर…. उदय सांगळे यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी जाहीर करून आमदार माणिकराव कोकाटे यांच्या समोर आव्हान दिले असल्याने आता सध्या तरी आ.कोकाटे आणि उदय सांगळे यांच्या त खास लढत होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या दृष्टीने वाटचाल करताना दिसत असलेल्या इतर पक्षांच्या नेत्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मतदार संघात आपण इच्छुक असल्याचे सांगून आम्ही निवडुन आल्यानंतर कशाप्रकारे तालुक्यातील विकास करता येईल या बाबतीत सविस्तर माहिती देताना दिसत आहेत . आमदार कोकाटे पराभूत कसे होतील अशी मोर्चे बांधणी केली जाते आहे.. परंतु सगळे जण एकत्र येण्याऐवजी ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची विचार करत असतील तर त्यांना फारसा उपयोग होईल असे वाटत नाही.जोपर्यंत सर्व एक होत नाही तोपर्यंत विजया चे स्वप्न साकार व्हायला हवी तशी हवा लागते..
आमदार कोकाटे यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात जवळ
पास सर्वच ठिकाणी दमदार विकास कामांचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे कोकाटे हे सर्व सामान्य जनतेच्या गळ्यातला ताईत बनले आहेत व त्यांच्या अथक प्रयत्नानंतर सिन्नर तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे व त्याचा फायदा लोकांना होत आहे तर मग हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे धाऊन काय उपयोग.. असा सूर सर्व स्तरातून गावातील लोकांच्या बोलण्यातुन दिसून येत आहे त्यामुळे विरोधात असणारे उमेदवार यांना हि निवडणूक पाहिजे तेवढी सोपी वाटते आहे का? याचाही विचार होणे गरजेचे आहे …!
.
प्रतिनिधी भाऊसाहेब हंडोरे सिन्नर
aonenewsmaharashtra@gmail.com
जाहिरात व बातम्यासाठी संपर्क 9422952513
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





