best news portal development company in india

पिंपळगाव बसवंत बाजार समितीत उन्हाळी कांद्याला प्रतिक्विंटल ३,१६० रुपयांचा उच्चांकी भाव; १,०३७ वाहनांची आवक

SHARE:



पिंपळगाव बसवंत: ए वन न्युज महाराष्ट्र| प्रतिनिधी

    नाशिक:कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत येथे दि. २७ जून २०२६ रोजी उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. दिवसभरात ६२८ ट्रॅक्टर आणि ४०९ पिकअप अशा एकूण १,०३७ वाहनांमधून कांद्याची आवक नोंदविण्यात आली. लाल कांद्याची मात्र कोणतीही आवक झाली नाही.

बाजार समितीने जाहीर केलेल्या दरानुसार उन्हाळी कांद्याला प्रतिक्विंटल किमान १,४०० रुपये, कमाल ३,१६० रुपये तर सरासरी २,३०० रुपये भाव मिळाला. तर गोल्टी कांद्याला किमान ७०० रुपये, कमाल १,६५५ रुपये आणि सरासरी १,३०० रुपये दर मिळाला.

दरम्यान, २६ जून २०२६ रोजी टोमॅटोची ७११ कॅरेट आवक झाली. टोमॅटोला प्रति कॅरेट किमान ५० रुपये, कमाल ४०१ रुपये आणि सरासरी २५१ रुपये भाव मिळाल्याची नोंद आहे.

उपबाजार आवारातील भुसार मालाच्या बाजारभावानुसार सोयाबीनला किमान ५,१०० रुपये, कमाल ७,००० रुपये व सरासरी ६,९५० रुपये, मक्याला किमान १,६०१ रुपये, कमाल २,२६६ रुपये व सरासरी २,२०० रुपये, तर गव्हाला किमान २,२०१ रुपये, कमाल २,४११ रुपये व सरासरी २,३७५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

📢 शेतकरी बांधवांसाठी सूचना

AONE NEWS MAHARASHTRA च्या माध्यमातून दररोज सायंकाळी ६:३० वाजता राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांतील ताजे बाजारभाव, आवक आणि शेतीविषयक महत्त्वाच्या घडामोडी पाहायला मिळतील. बाजारभावांची अचूक व विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी AONE NEWS MAHARASHTRA सोबत जोडलेले राहा.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई