best news portal development company in india

राष्ट्रवादी काँग्रेसच्या लढ्याला मोठे यश! कोपरगावातील घरपट्टी वाढीला तूर्तास स्थगिती…

SHARE:

प्रतिनिधी: निवृत्ती पगार ,कोळपेवाडी

कोपरगाव : शहरातील अवाजवी घरपट्टी वाढ आणि नागरिकांवर लादण्यात आलेल्या जनविरोधी निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने छेडलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. नगरपरिषद प्रशासनाने येणाऱ्या सर्वसाधारण सभेपर्यंत घरपट्टी वाटप प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले.

कोपरगाव शहरात करण्यात आलेल्या घरपट्टी वाढीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. वाढीव घरपट्टीची बिले नागरिकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात आले होते. या आंदोलनाला शहरातील नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळाला.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत, येणाऱ्या सर्वसाधारण सभेपर्यंत वाढीव घरपट्टीची बिले वितरित न करण्याचे स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या लढ्याला पहिला मोठा विजय मानला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आता घरपट्टी वाढीचा प्रस्ताव नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी ठेवण्यात येणार आहे. त्या सभेत या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेतला जाणार असून, तोपर्यंत नागरिकांना वाढीव घरपट्टीची बिले दिली जाणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनीही नागरिकांच्या हितासाठी ही अवाजवी घरपट्टी वाढ पूर्णपणे रद्द अथवा स्थगित करण्यासाठी सभागृहात ठामपणे पाठपुरावा करण्याची भूमिका घेतली आहे.

या आंदोलनादरम्यान उपमुख्याधिकारी मनोजकुमारजी पापडीवाल, कर विभागाचे श्री. धुमाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव निर्माण करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आल्याचे बोलले जात आहे.

कोपरगाव शहरातील घरपट्टी वाढीच्या प्रश्नावर आता सर्वांचे लक्ष नगरपरिषदेच्या आगामी सर्वसाधारण सभेकडे लागले आहे. नागरिकांना न्याय मिळतो का, अवाजवी वाढ मागे घेतली जाते का आणि प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

सत्य,वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी“एवन न्यूज महाराष्ट्र” या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा,कमेंट करा.
संपादक:अरुण चंद्रभान गायकवाड,
उपसंपादक:ज्ञानेश्वर यशवंत सांगळे,
जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क साधा: -9422952513/9637100608
प्रतिनिधी:निवृत्ती पगार
एवन न्युज महाराष्ट्र
कोळपेवाडी
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई