धामोरी प्रतिनिधी | दत्तात्रय घुले
कोपरगाव: तालुक्यातील धामोरी येथे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धामोरी तसेच नवनाथ नगर भागातील उर्दू शाळा येथे गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी वह्यांचे वाटप करण्यात आले. यासोबतच शाळा परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून, शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण जपण्याची जाणीव समाजापर्यंत पोहोचविण्याचा स्तुत्य प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. वाढदिवस साजरा करण्याचा हा सामाजिक आणि विधायक उपक्रम ग्रामस्थ, पालक आणि शाळा प्रशासनाच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष निवृत्ती शिंदे हे होते. यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे माजी व्हा. चेअरमन कैलासराव माळी, बाजीराव पाटील मांजरे, राहुलजी वाणी, मोहनराव जगझाप, नाजीम शेख, अण्णासाहेब साळुंखे, बाळासाहेब आहिरे, वसंतराव वेलजाळे, बाबासाहेब गांगुर्डे, वसंतराव माळी, बबनराव भाकरे, कैलास नळे, दत्तात्रय पगार, दगडू वाघ, राजाभाऊ शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आहिरे सी. एस. मॅडम, लामखडे एस. जी., दिघे एस. व्ही., शिगांडे ए. जे., रणदिवे एस. के., राठोड एस. एम., साबळे डी. एल., श्रीमती भोसले एस. एस. मॅडम यांच्यासह शाळेतील शिक्षकवर्ग, कर्मचारी, पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले. अनेक गरजू विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे साहित्य अत्यंत उपयुक्त ठरत असल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. त्यानंतर शाळा परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. “विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याबरोबरच हरित वातावरण निर्मितीची जाणीवही रुजवली पाहिजे,” हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
धामोरी परिसरात सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाला एक वेगळे आणि प्रेरणादायी स्वरूप लाभले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात देतानाच वृक्षारोपणासारख्या उपक्रमातून समाजात सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

संपादक:अरुण गायकवाड,
उपसंपादक:ज्ञानेश्वर सांगळे,
जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क साधा: -9422952513/9637100608

एवन न्युज महाराष्ट्र
धामोरी
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





