best news portal development company in india

गोदा–नर्मदा जलयात्रेचे कोळपेवाडीत जल्लोषात स्वागत; संजीवनी उद्योग समूहाचा पुढाकार, पाणीप्रश्नावर दीर्घकालीन उपायांची ग्वाही…

SHARE:

प्रतिनिधी:निवृत्ती पगार,कोळपेवाडी
कोळपेवाडी (ता. कोपरगाव) : गोदावरी ते नर्मदा जलजोड प्रकल्पाच्या जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या ‘गोदा–नर्मदा जलयात्रे’चे कोळपेवाडीत संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने उत्साहपूर्ण आणि भव्य स्वागत करण्यात आले. उद्योग समूहाचे नेतृत्व करणारे बिपिन दादा कोल्हे यांच्या हस्ते जलयात्रेचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी बांधव, स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत राज्यातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन उपाययोजनांची गरज अधोरेखित करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची निविदा प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी आणि ठोस तोडगा काढण्यासाठी हा निर्णय निर्णायक ठरणार असून, राज्याच्या जलसुरक्षेला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. पाणी व्यवस्थापन, जलसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षण यांचा व्यापक संदेश या जलयात्रेद्वारे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.


कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, राज्यसभा खासदार रामराव वडकुते, तसेच स्थानिक नगरसेवक, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जलसुरक्षा, शाश्वत पर्यावरण आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी शासनाच्या धोरणांना पाठबळ देत ‘गोदा–नर्मदा’ जलजोड प्रकल्प राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा एकमताने विश्वास व्यक्त करण्यात आला.

सत्य,वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी “एवन न्यूज महाराष्ट्र” संपादक: अरुण चंद्रभान गायकवाड- 9422952513
उपसंपादक: ज्ञानेश्वर यशवंत सांगळे- 9637100608
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई