best news portal development company in india

अशांना चौरंग शिक्षा का होऊ नये? 70 वर्षांच्या वृद्धेचा वासनेचा शिकार करण्याचा प्रयत्न, गावकऱ्यांनी तर हद्द केली! – News18 मराठी

SHARE:

भागलपूर: बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली. तिथे 70 वर्षांच्या एका वृद्ध महिलेवर एका व्यक्तीने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक बाब म्हणजे महिलेनं पंचायतीकडे याबाबत दाद मागितली असता पंचायतीने अडीच लाखांत हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महिलेनं पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीला पोलिसांनीदेखील हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला; पण नंतर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

बिहारमधल्या भागलपूर इथे एका व्यक्तीने 70 वर्षांच्या वृद्ध महिलेला वासनेची शिकार बनवण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण पंचायतीसमोर मांडलं गेलं तेव्हा पंचायतीने महिलेच्या अब्रूची बोली लावली. पंचायतीने महिलेला अडीच लाख रुपये देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला आणि संबंधित व्यक्तीला या प्रकरणातून मुक्त केलं. प्रकरण पोलिसांकडे गेल्यावर त्याचा तपास सुरू झाला.

नवगछिया इथल्या इस्माइलपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. पीडित महिलेनं पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवला आहे. पीडितेसोबत पोलीस स्टेशनला गेलेल्या तिच्या नातवानं सांगितलं, की माझी आजी दोन दिवसांपूर्वी सायंकाळी मैदानात फिरायला निघाली होती. त्यावेळी आरोपी छैला मंडलने तिला पकडून वासनेची शिकार बनवण्याचा प्रयत्न केला. पीडितेनं आरडाओरडा करताच आसपासचे नागरिक जमा झाले. लोकांना पाहून आरोपी पळून जाऊ लागला; पण लोकांनी पाठलाग करून त्याला पकडलं.

त्यानंतर गावाचे माजी प्रमुख सुजित कुमार यांनी पंचायत बोलावली आणि वृद्ध महिलेला अडीच लाख रुपये देऊन प्रकरण मिटवण्यासाठी दबाव टाकला. ‘मी आरोपीला सोडणार नाही,’ असं पीडित महिलेनं सागितलं. त्यानंतर तिने पोलीस कंट्रोल रूमला फोन केला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पीडितेनं पोलिसांना सांगितलं, की या प्रकरणात गावाच्या पंचायतीनं माझ्या अब्रूची बोली लावली. पोलिसांनीदेखील सुरुवातीला प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला; पण आमदार गोपाल मंडल यांनी हस्तक्षेप केल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.

  • First Published :

Source link

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई