प्रतिनिधी: ए वन न्युज महाराष्ट्र,देवळा(नाशिक)
देवळा:नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील महात्मा फुले नगर येथील श्री रामेश्वर कृषी मार्केट या खासगी कृषी बाजाराचा परवाना महाराष्ट्र राज्याच्या पणन संचालकांनी रद्द केला आहे. कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ अंतर्गत देण्यात आलेला हा आदेश ३० जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आला असून, बाजार परवानाधारकाने कायद्यांतर्गत असलेल्या वैधानिक जबाबदाऱ्यांचे गंभीर उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
आदेशानुसार, संबंधित खासगी बाजार परवानाधारकाने खाजगी बाजार परवाना अधिनियम, १९६३ व नियम, १९६७ मधील तरतुदींचे पालन करण्यात गंभीर कसूर केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितावर प्रतिकूल परिणाम झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम ५-ड (४)(अ) अंतर्गत कारवाई करत खासगी बाजाराचा परवाना रद्द करण्यात आला.
पणन संचालक शरद जरे यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, श्री रामेश्वर कृषी मार्केट, महात्मा फुले नगर, ता. देवळा, जि. नाशिक यांना देण्यात आलेला खासगी बाजार परवाना क्रमांक पीएमएफएल-७६/२०२२ तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आला आहे.
यासोबतच, आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, या आदेशाच्या दिनांकापासून संबंधित संस्थेला परवान्याच्या आधारे खासगी बाजारात शेतमालाची खरेदी-विक्री करण्याचा कोणताही अधिकार राहणार नाही. आदेशाचे उल्लंघन करून व्यवहार सुरू ठेवल्यास संबंधितांविरुद्ध कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियम, १९६३ आणि नियम, १९६७ मधील तरतुदीनुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आदेशाच्या प्रती श्री रामेश्वर कृषी मार्केटचे संचालक/सचिव, संबंधित मालक, नाशिक जिल्हाधिकारी तसेच सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी यांना आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.
या कारवाईमुळे नाशिक जिल्ह्यातील खासगी कृषी बाजारांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या परवानाधारकांवर शासन कठोर भूमिका घेत असल्याचे या निर्णयातून स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण आणि कृषी बाजार व्यवस्थेतील पारदर्शकता कायम राखण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





